Best Postpaid Recharge Plans | ‘या’ टेलिकॉम कंपन्यांकडे आहे बेस्ट पोस्टपेड प्लान ! डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक मिळतील फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Postpaid Recharge Plans | भारतातील अनेक खासगी टेलिकाॅम कंपन्या आपल्या कोट्यवधी ग्राहकाला अनेक फायदेशीर ऑफर देत असते. एक महिन्यापासून एका वर्षापर्यंत अनेक चांगल्या ऑफर दिले जातेय. यामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अपडेट करत असते. आता कंपन्याकडे प्रीपेड प्लान्सची मोठी यादी उपलब्ध आहे. तसेच, कंपन्या स्वस्त पोस्टपेड रिचार्ज प्लानही (Postpaid Recharge Plan) देत असते. Jio, Airtel आणि Vi कडे 399 रुपयांचा शानदार पोस्टपेड प्लान (399 Postpaid Plans) उपलब्ध आहे. या तिन्ही कंपन्याचे प्लान मात्र वेगवेगळे आहे. याचे फायदे काय आहे ? जाणून घ्या. (Best Postpaid Recharge Plans)

 

जिओ (Jio) –
रिलायन्स – जिओ कडे 399 रुपयांचा बेस्ट पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये 75 जीबी डेटा (GB Data) दिला जातो. तसेच, 200 जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लानमध्ये अतिरिक्त फायदे देखील दिले जातात. जिओ अ‍ॅप्ससह Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जातेय.

एअरटेल (Airtel) –
यामध्ये 399 रुपयांचा पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. यात जिओच्या तुलनेत निम्मा डेटा मिळतो. तसेच यामध्ये 40 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, डेटा रोल ओव्हरची देखील सुविधा मिळते. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह दररोज 100 SMS दिले जातात. त्याचबरोबर, Airtel Thankx App, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

 

वोडाफोन (Vodafone) –
वोडाफोन (Vi) च्या या प्लानमध्ये 40 जीबी डेटा (40 GB Data) दिला जातो.
त्याचबरोबर, 200 जीबी डेटा रोल ओव्हरची सुविधा मिळते.
या प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, एसएमएस दिले जातात.
तसेच, Vi Movies & TV, Hungama Music आणि Zee5 चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

 

Web Title :- Best Postpaid Recharge Plans | airtel vs jio vs 399 postpaid plan know which is better

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा