शेविंग क्रीमला घरातच उपलब्ध आहेत ‘हे’ पर्याय

पोलीसनामा ऑनलाइन – शेविंग क्रीम संपली असल्यास किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या वापरून नैसर्गिकरित्या शेविंग करता येईल. यामुळे त्वचा शेविंग क्रीमपेक्षा जास्त सॉफ्ट आणि क्लोज शेव होईल. किचनमधील या गोष्टींबाबत जाणून घेऊयात.

पहिला पर्याय आहे कच्चे दूध. हे चेहऱ्यावर लावल्याने स्किन आणि केस सॉफ्ट होतात आणि शेव चांगल्या प्रकारे करता येते.
तसेच मध कोमट पाण्यात टाकून याने चेहऱ्याची मसाज केल्यास केस सॉफ्ट होतील आणि शेविंगही चांगली होऊ शकते.

आणखी एक उपाय म्हणजे शेविंग करण्याअगोदर खोबरेल तेलाने त्वचेची हलकी मसाज करा. यामुळे रेजर बर्न आणि डड्ढायनेसपासून सुटका मिळते.

बटर हेदेखील एक चांगले मॉश्चरायजर आहे. हे कडक केसांना सॉफ्ट बनवते ज्यामुळे ते सहज निघतात. तसेच शेविंग क्रीम नसेल तर त्वचेवर केळीची पेस्ट लावून मसाज करा. यानंतर शेविंग केली तर सहज शेव होईल. पपईदेखील असाच उपयोगी आहे. यामधील पापेन नामक एंजाइम त्वचेचे रॅशेज आणि जळजळ दूर करते. चेहऱ्यावर मसाज करुन नंतर शेव करता येईल.

तसेच एलोवेरा जेल हे आरामदायक गारवा देते. याने त्वचेवर हलकी मसाज करा आणि नंतर शेविंग केल्यास जळजळही होणार नाही. तसेच बदाम तेल वापरून ही शेविंग करता येईल. शेविंग करण्याअगोदर बदाम तेलाने मसाज केल्याने शेविंग करताना जळजळ होणार नाही. तसेच याने इरिटेशन होत नाही. त्वचा मऊ होते.