‘या’ 4 पध्दतीनं झोप घेतली तर आरोग्य अतिउत्तम राहिल, शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चांगल्या आरोग्यासाठी, डॉक्टर 7-8 तास पूर्ण आणि आरामदायक झोपेची शिफारस करतात. परंतु आपणास माहित आहे की चांगली झोप मिळण्यासाठी चांगल्या पोझिशनवर झोप घेणे महत्वाचे आहे. झोपेच्या पोझिशनचेही आपल्या आरोग्यावर बरेच परिणाम होतात. झोपण्याच्या कोणत्या पद्धती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत याबाबत माहिती घेऊया.

१) गुडघ्यात उशी घेऊन झोपणे
बरेचदा तुम्ही पाहिले असेलच की लोक डोक्याखाली उशी ठेवण्याऐवजी पायांमध्ये अडकवून झोपतात. या सवयीसाठी अनेक वेळा कुटुंबातील सदस्य आपल्याला बोलत असतील परंतु अशा प्रकारे उशी घेऊन झोपल्यामुळे थकलेल्या पायांना आराम मिळतो.

२) डोक्याखाली २ उशा घेऊन झोपणे
बर्‍याच लोकांना डोक्याखाली दोन उशा ठेवण्याची सवय असते. आपल्याला माहिती आहे का ? की सायनसच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांसाठी ही स्थिती खूप फायदेशीर आहे. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर डोक्याखाली दोन उशा ठेवा आणि झोपा जेणेकरून झोपताना तुमचे डोके किंचित वर होईल.

३) पायांमध्ये उशी घेऊन झोपणे
मासिक पाळी दरम्यान अनेकांना पाठदुखीची समस्या असते. ही समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या गुडघ्याखाली उशी घेऊन झोपू शकता. यामुळे आपले पाठ आणि पाय दुखण्यापासून आराम मिळेल.

४) पालथे झोपण्याचे फायदे
जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर ची समस्या असेल तर झोपेची योग्य पोझिशन तुमचा बीपी नॉर्मल ठेवायला मदत करू शकेल. याकरिता तुम्हाला सरळ झोपण्याऐवजी पालथे झोपण्याची पोझिशन मदत करू शकेल. त्यामुळे तुमचे ब्‍लड प्रेशर कमी होऊ शकेल.