‘हे’ आहेत भन्नाट फीचर्स असणारे 6 हजार रूपयांपर्यंतच्या बजेटमधील सर्वात बेस्ट स्मार्टफोन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रत्येकाला एक चांगला आणि स्वस्त स्मार्टफोन घ्यायचा असतो, पण आजकाल बाजारात इतकी व्हरायटी आहे की, सगळे जण कोणता फोन खरेदी करायचा याबद्दल कन्फ्युज होतात. पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आपण ६,००० च्या किंमतीतील अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत.

शाओमी Redmi 7A
रेडमी 7 ए चा हा फोन 5.45 इंचाचा HD+ डिस्प्लेसह येतो आणि त्याचा आस्पेक्ट रेशोही 18:9 आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा Sony IMX486 सेन्सर आहे आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये पीडीएएफ, ऑटो एचडीआर आणि सिंगल-टोन फ्लॅश आहे, या व्यतिरिक्त सेल्फी कॅमेरा एआय बॅकग्राऊंड ब्लरिंग आणि एआय ब्यूटीफाय मोडस सपोर्ट करतो. शाओमी रेडमी 7 ए ची किंमत ५,९९९ रुपये आहे.

रिअलमी C2 16GB
रिअलमी सी2 मोबाइल फोन 6.1 इंचाच्या ड्युड्रॉप नॉचसह एचडी+ रिझोल्यूशन स्क्रीनसह येतो. या फोनची रॅम 2 जीबी आहे. यात 4 हजार एमएएच बॅटरी देखील आहे. यात 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोनची किंमत ८,९९० रुपये आहे.

HONOR 9S
ऑनर 9 एस स्मार्टफोन 5.45 इंचासह येतो. त्याचा पिक्सेल रेझोल्यूशन 720 x 1440 आहे. हा फोन 2 जीबी रॅमसह येतो. ऑनर 9एस अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. याशिवाय फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये 3020 एमएएच बॅटरी आहे. 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.

शाओमी REDMI 6
रेडमी 6 मध्ये 5.45-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशो 18:9 आहे. फोनला मेटलिक फिनिश आहे. रेडमी 6 मध्ये हेलियो पी22 प्रोसेसर आहे. याचा कॅमरो 12+5 मेगापिक्सेलचा आहे. 3000 एमएएच बॅटरी देखील आहे. शाओमी रेडमी 6 ची किंमत ८,४९० रुपये आहे.

शाओमी REDMI GO
शाओमी रेडमी गो मध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन (720×1280 पिक्सल) आहे आणि या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 16:9 आहे. या स्मार्टफोनमध्ये 3000mAh बॅटरी आहे. यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. शाओमी रेडमी गो ची किंमत ४,७४० रुपये आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like