फायद्याची गोष्ट ! 10 हजार रूपयांपेक्षा स्वस्त ‘हे’ 5 स्मार्टफोन, पावरफुल बॅटरी आणि भन्नाट कॅमेर्‍यासोबतच 4GB रॅम

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

Samsung Galaxy M30 – सॅमसंग गॅलेक्सी एम 30 चे बेस वेरियंट 9,649 रुपयात उपलब्ध आहे. गॅलेक्सी एम 30 ची खासियत म्हणजे यामध्ये 6.38 इंचाचा फुल-एचडी+ सुपर अमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे डिझाईन इन्फिनिटी यू वाले आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉचसह सादर केला आहे. याशिवाय यामध्ये ऑक्टा-कोर एक्सीनॉस 7904 प्रोसेसर आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सल दूसरा 5 आणि तिसरा 5 मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5,000 एमएएचची बॅटरी आहे.

Realme 5 – रिलयमी 5 तीन स्टोरेज वेरियंटस येतो. 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटर्नल स्टोरेजच्या मॉडलची किंमत 9,999 रुपये आहे. तर, 4जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजच्या मॉडलची किंमत 10,999 रुपये आहे. 4जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल वेरियंट 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Realme 5S – रियलमी 5एस, 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेजच्या बेस मॉडलची किंमत 9,999 रुपये आहे. यामध्ये 6.51 इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. रियलमी 5 एस स्नॅपड्रॅगन 665 एसओसी प्रोसेसरवर करतो. फोनचे वैशिष्ट याचा 48 मेगापिक्सल कॅमेरा आहे. फोनच्या रियरमध्ये 4 कॅमरे दिले आहेत, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा वाईड-अँगल शूटर, 2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 5000एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Redmi Note 8 – रेडमी नोट 8ची सुरूवातीची किंमत 9,999 रुपये आहे. रेडमी नोट 8 मध्ये 6.39 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे, जो 1080-2340 पिक्सल रेज्यूलेशनसह येतो. फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनलवर गोरिल्ला ग्लास 5चे प्रोटेक्शन दिले गेले आहे. याच्या डिस्प्लेमध्ये वाटरड्रॉप नॉच आहे. झाओमीच्या या बजेट फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचा 48 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा आहे. रेडमी नोट 8 मध्ये चार रियर कॅमेरा आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाइड-एँगल शूटर आणि 2 मेगापिक्सलचे दो सेंसर आहेत. फ्रंट कॅमेरा म्हणून यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo U10 – वीवो यु10 हा स्मार्टफोन 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये हॅलो फुलव्ह्यू, एचडी प्लस आयपीएस 6.35 चा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे, ज्याचा अस्पेक्ट रेशियो 19.5:9 आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 81.91 % आहे. वीवो यु10 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 13 मेगापिक्सलचा सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट शॉट्स एफ/2.4 अपर्चरसह आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये 5000एएमएच बॅटरी आहे, जी 18वॅटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.