‘हे’ आहेत 10 हजार रूपयांच्या आतील ‘स्मार्टफोन्स’, 5000 mAh बॅटरी आणि 4 कॅमेरे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेडमी नोट 8 – शाओमीच्या या स्मार्टफोनला 10,000 रुपयांच्या किंमतीवर ई-कॉमर्स वेबसाइटवरून आपण खरेदी करू शकता. यामध्ये आपल्याला 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंट मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 665 ऑक्टाकोर वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

1) विवो यू 20
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. डिस्प्ले 6.5 इंच असून हा स्मार्टफोन फुल एचडी प्लस आहे. विवो U20 चे दोन व्हेरियंट आहेत. या किंमतीवर आपण बेस व्हेरियंट घेऊ शकतात ज्यात 4GB रॅम सोबतच 64GB ची इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे आपण यास वाढवू शकता.

2) गॅलेक्सी एम 30
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ट्रिपल रीअर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे आणि सेल्फीसाठी नॉच देण्यात आला आहे. Galaxy M30 मध्ये Exynos 7904 प्रोसेसर देण्यात आले आहे.

3) रिअलमी 5S
या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये देखील आपणास चार कॅमेर्‍याचे सेटअप देण्यात आले आहेत. प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल आहे, दुसरी 8 मेगापिक्सेल आहे आणि दोन 2-2 मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh ची आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

4) रिअलमी 5
रिअलमी 5 मध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्राथमिक लेन्स 12 मेगापिक्सल आहे, दुसरी 8 मेगापिक्सेल आहे. दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सेल दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. रिअलमी 5 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसरवर चालतो.