आता सगळे जुने उपाय विसरा आणि वॅक्सिंगचा ‘हा’ पर्याय निवडा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना शरीर आणि चेहऱ्यावरील केस त्रासदायक वाटू लागतात. या अनावश्यक केसांमुळे चेहरा आणि त्वचेचा लूक बदलू शकतो. म्हणून मुली यासाठी थ्रेडिंगचा वापर करताना दिसतात. मात्र, जर तुम्हाला नको असलेले काढायचे असतील तर वॅक्सच्या मदतीने काढलं तर फरक दिसून येईल. कारण थ्रेडिंग पेक्षा वॅक्सिंगचे अनेक फायदे दिसून येतात.

या प्रकाराला कटोरी वॅक्स असं म्हटलं जात. कारण एका मेटलच्या वाटीत वॅक्स घेतलं जात. त्याचा वापर चेहरा आणि त्वचेवरील अनावश्यक असलेले केस काढण्यासाठी करण्यात येतो. या प्रयोगासाठी सर्वात प्रथम आधी वाटी गरम करा. मग वॅक्स त्याच्यामध्ये टाका. वॅक्स वितळल्यानंतर थोडं थंड होऊ द्या. परत त्वचेच्या ज्या भागांवर जास्त केस आहेत त्या भागावर लावा आणि थंड होण्याची वाट बगा. त्यानंतर ज्या दिशेने तुमचे केस उगवत असतील त्याच्या विरुद्ध बाजूने स्ट्रीप ओढा.

चांगल्या लूकसाठी
थ्रेडिंगच्या वापरामुळे तुमची त्वचा खराब होते आणि फ्लॉलेस लूक येत नाही. मात्र, वॅक्सिंगच्या मदतीने तुम्ही केस काढत असाल तर त्वचा गोरी आणि मुलायम दिसू लागते. केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर करा. नाहीतर केस उलटसुलट दिशेने उगवून येतात. वेळेअभावी मुली घाइघाईत रेंजर फिरवतात. त्यामुळे त्याभागावर येणारे केस हे तुलनेने रखरखीत असतात. आणि तिथे त्वचेला काळपटपणा येतो. तसेच पुळ्या देखील येतात. पण कटोरी वॅक्स केल्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम होते.

त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेवर आलेले अनावश्यक केस काढण्यासाठी तुम्ही रेजरचा वापर करत असाल तर केसांची वाढ लगेच होते. पण या पद्धतीने वॅक्सिंग कराल तर त्वचा चांगली राहते. त्वचेला कोणत्याही प्रकारची वेदना निर्माण होत नाही.

हेअर ग्रोथ कमी होते.
वॅक्स केल्यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होते. तसेच घरच्याघरी केलेलं वॅक्स हे हेअर ग्रोथ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. शरीरातील तसेच त्वचेवर रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे तुमचा चेहरा टवटवीत आणि गुलाबी होतो.