Best Stocks To Buy | सध्या खरेदी करण्यासारखे आहेत ‘हे’ अनेक शेअर, बाजारातील घसरणीत चांगली संधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Stocks To Buy | अनेक वर्षांमधील सर्वाधिक महागाई (Inflation) आणि जागतिक आर्थिक मंदी (Recession) च्या शक्यतेमुळे जगभरातील शेअर बाजार (Share Market) घसरत आहेत. या वर्षी आतापर्यंत बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) 10 टक्क्यांपर्यंत तोट्यात आहेत. ब्लू चीप स्टॉक्स असो वा मिडकॅप-स्मॉलकॅप, सर्वांची स्थिती सारखीच आहे. (Best Stocks To Buy)

 

मात्र, यानंतरही बाजारातील अनेक तज्ज्ञ बुलीश आहेत. टॉप ब्रोकरेज फर्म बाजारातील घसरणीला शेअर खरेदीची चांगली संधी मानत आहेत. टॉप ब्रोकरेज फर्मनुसार कोणते स्टॉक खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेवूयात…

 

एंजल ब्रोकिंगला पसंत हे 5 स्टॉक्स

ब्रोकरेज फर्म एंजेल ब्रोकिंग (Angel Broking) च्या म्हणण्यानुसार, अंबर एंटरप्रायझेस (Amber Enterprises) चा अशा शेअरमध्ये समावेश आहे. ब्रोकरेज फर्मने त्यांना 3,850 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे, तर सध्या हा स्टॉक सुमारे 2,281 रुपये आहे.

म्हणजेच हा शेअर 69 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. अंबर एंटरप्रायझेस रूम एअर कंडिशनर्सच्या आउटसोर्स मॅन्युफॅक्चरिंग स्पेसमध्ये मार्केट लीडरच्या भूमिकेत आहे. (Best Stocks To Buy)

त्याचप्रमाणे एंजल ब्रोकिंगला फोर्जिंग कंपनी रामकृष्ण फोर्जिंग्ज (Ramkrishna Forgings) कडून मोठ्या आशा आहेत. ब्रोकरेज फर्मने 164 रुपयांच्या या स्टॉकला 256 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

म्हणजेच येत्या काळात हा शेअर 56 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या मागणीमुळे या कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास एंजल ब्रोकरेजला आहे.

एंजेल ब्रोकिंगला स्टोव्ह क्राफ्टकडूनही खूप आशा आहेत.
ही कंपनी Pigeon आणि Gilma या ब्रँड नावाने प्रेशर कुकर, एलपीजी स्टोव्ह, नॉन-स्टिक कुकवेअर इ. बनवते.
गेल्या दोन वर्षांपासून ही कंपनी बाजाराच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे.

एंजेल ब्रोकिंगच्या मते, या कंपनीचा शेअर आगामी काळात 805 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, तर सध्या त्याची किंमत 552 रुपये आहे.
याचा अर्थ हा स्टॉक 45% रिटर्न देऊ शकतो.

एंजेल ब्रोकिंगने Suparjit Engineering कडूनही शक्यता व्यक्त केली आहे.
कंपनी घरगुती ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सना ऑटोमोटिव्ह केबल्स पुरवते. गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने आपल्या पोर्टफोलिओचा झपाट्याने विस्तार केला आहे.

कंपनी शेअरची सध्याची किंमत 317 रुपये आहे. एंजल ब्रोकिंगने त्यासाठी 485 रुपयांचे टार्गेट दिले आहे. याचा अर्थ या स्टॉकमध्ये 53 टक्के रिटर्न देण्याची शक्यता आहे.

एंजेल ब्रोकिंगची पाचवी निवड Sona BLW Precision Forgings आहे. सध्याच्या 570 रुपयांच्या मार्केट व्हॅल्यूच्या तुलनेत त्यांच्या शेअरची टार्गेट प्राईस 843 रुपये आहे. एंजेल ब्रोकिंगच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना 48 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो.

ही कंपनी भारतातील टॉप ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक आहे. तिला सुमारे 40 टक्के महसूल बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल आणि हायब्रीड व्हेईकल्समधून येतो. ईव्ही आणि एचव्हीच्या प्रसारामुळे या कंपनीची शक्यता अधिक चांगली आहे.

 

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे टॉप पिक

Ratnamani Metals and Tubes कंपनीचा स्टॉक आणखी एक ब्रोकिंग फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) चा आवडता आहे.
त्याची सध्याची मार्केट व्हॅल्यू 2,519 रुपये आहे आणि त्याचे टार्गेट 2,950 रुपये आहे.

म्हणजेच हा शेअर 17 टक्क्यांवर जाऊ शकतो.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजला वाटते की कंपनीचे भविष्य चांगले आहे कारण ती देशांतर्गत औद्योगिक पाईप्सच्या व्यवसायात अग्रेसर आहे आणि त्यामुळे स्टॉकची शक्यता चांगली आहे.

आयीसीआयसीआय सिक्युरिटीजने कोल इंडियाला चांगली क्षमता असलेला स्टॉक मानते.
ब्रोकरेज फर्मनुसार, सरकारी मालकीच्या या कोळसा कंपनीला ई-लिलावाचा फायदा होऊ शकतो.

त्याच वेळी, कोळशाच्या जागतिक किमतीत वाढ हा देखील यासाठी फायदेशीर सौदा आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या स्टॉकला 225 रुपयांचे टार्गेट दिले आहे, तर त्याची व्हॅल्यू सध्या 182 रुपये आहे.
म्हणजेच हा स्टॉक 24 टक्के रिटर्न देऊ शकतो.

 

B&K Securities ला यातून अपेक्षा

ब्रोकरेज फर्म B&K Securities ने Hikal च्या स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता नोंदवली आहे.
हा स्टॉक सध्या रु. 258 वर आहे, 715 रु.च्या ऑल टाइम हायवरून 62 टक्क्यांनी खाली आहे.

या ब्रोकरेज फर्मने 450 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
म्हणजेच ब्रोकरेज फर्मला वाटते की हा स्टॉक 74 टक्क्यांवर जाऊ शकतो.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Best Stocks To Buy | best stocks to buy now recommendations of angel broking icici securities

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा