सतत बैठे काम केल्याने होत असेल बॅकपेन, तर ‘या’ 3 स्ट्रेचिंग आजच ट्राय करा

पोलिसनामा ऑनलाइन – ऑफिसमध्ये सतत बैठे काम केल्याने पाठदुखीचा त्रास अनेकांना जाणवतो. सध्या कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने जास्त काम सर्वांना करावे लागत आहे. अशा कामामुळे कंबरदुखीसह अनेक समस्या निर्माण जाणवतात. वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या, इंजेक्शन घेण्याऐवजी नैसर्गिक उपाय कधीही चांगलेच ठरतात. यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज लाभदायक ठरते. अशाच 3 स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण जाणून घेणार आहोत.

1. बॅक एक्सटेंशन
मॅटवर झोपा. हात छातीच्या बाजूला सरळ ठेवून हळुहळु छाती वरच्या दिशेने उचला आणि श्वास आत घ्या. शरीराचा वरचा भाग जेवढ वर नेता येईल तेवढा न्या. या स्थितीत किमान 5 सेकंद राहा. आता आर्म्सची स्टेस रिलीज करा आणि श्वास बाहेर सोडत पूर्व स्थितीत या.

2. क्रॉस बॉडी शोल्डर स्ट्रेच
दुसर्‍या हाताने कोपर्‍याच्या वर हात पकडा आणि शरीर छातीकडे तोपर्यंत खेचा जोपर्यंत खांद्यांमध्ये ताण जाणवत नाही. या स्थितीत किमान 30 सेकंद राहा. नंतर पुन्हा हिच क्रिया दुसर्‍या बाजून करा.

3. ट्वीस्ट
आरामदायक क्रॉस लेग्ज पोझीशनमध्ये बसा आणि आपले शरीर कमरेतून आपल्या पाठीकडे हळुहळु फिरवा. डावा हात उजवा गुडघ्यावर ठेवा आणि आपला डावा खांदा पहा. 10 सेकंद केल्यानंतर सामान्य स्थितीत या. नंतर पुन्हा दुसर्‍या बाजूला करा.