धमन्यांमध्ये जमा होणाऱ्या ‘प्लाक’मुळं येऊ शकतो ‘हार्ट अटॅक’ ! जाणून घ्या बचावासाठीचे ‘हे’ 5 उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हार्ट अटॅकनं मृत्यू होणाऱ्या लोाकांची संख्याही बरीच आहे. अनेकदा 35 ते 40 या वयात अशा प्रकारे लोकांचा मृत्यू होतो. हार्ट अटॅकचं सर्वात मोठं कारण म्हणजे धमन्यांमध्ये जमा झालेले प्लाक आहेत. आजची लाईफस्टाईलही यासाठी कारणीभूत आहे. वाढत्या वयात धमन्यांमध्ये प्लाक होण्याचं प्रमाण वाढतं. यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.

1) नियमित व्यायाम – नियमित व्यायामुळं शरीर निरोगी राहतं. यामुळं कोलेस्ट्रॉलचंही प्रमाण वाढत नाही. रोज व्यायाम केला तर शरीरात एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. यामुळं धमन्यांमध्ये प्लाक जमा होत नाही.

2) मिठाचं सेवन – रक्तदाब संतुलित रहावा यासाठी मीठ फार महत्त्वाचं आहे. परंतु याचं सेवन प्रमाणात असावं. नाही तर उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मिठाचे योग्य प्रमाण हृदयाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे.

3) ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स – कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवयाची असेल तर ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यासाठी आहारात रोज 2 चमचे ऑलिव्ह ऑईल जाणं गरजेचं आहे. फळे, भाज्या कडधान्य यांचा आहरात समावेश असू द्या. हृदय तंदुरुस्त ठेवयाचं असेल तर तेलकट पदार्थ खाणं टाळा आणि जेवणाची वेळ चुकवू नका.

4) पुरेशी झोप – रोज किमान 8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. चांगली झोप नसेल तर हृदयाचे आरोग्य बिघडते, उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. त्यामुळं पुरेशी झोप घ्या.

5) धुम्रपान, तंबाखू, मादक पदार्थ – तंबाखूत कार्बन मोनॉक्साईड असतो जो रक्तातील ऑक्सिजन कमी करतो. परिणामी हृदयाला शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी बाधा येते. यामुळं हृदयाचे ठोके वाढतात. धुम्रपान केल्यास धमन्यांचंही मोठं नुकसान होतं. त्यामुळं मादक पदार्थांपासून दूर रहा.