भाजपकडून उद्धव ठाकरेंना ‘CM’ पदासाठी ‘शुभेच्छा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा घेणार आहेत असे आम्हाला कळाले आहेत. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप आणि सर्व मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले, “भाजप आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्या उपस्थितीत गरवारे क्लबमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सबळ विरोधीपक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेची सेवा करू. सर्व आमदारांच्या उपस्थितीत याबाबत ठराव बैठकीत पारित करण्यात आला आहे.”

पुढे बोलताना शेलार म्हणाले, “महाविकासआघाडीची बैठक पार पडल्याचं समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना तिघं मिळून सरकार स्थापन करत आहेत. आम्ही तिन्ही पक्षांना शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरें हे तिन्ही पक्षाचं नेतृत्व करत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत असे आम्हाला समजले आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करतो.”

महाविकासआघाडीच्या झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावर तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. आता महाविकासआघाडीचा सरकार स्थापन करण्यासाठीचा मार्ग मोकळा झााला आहे.

Visit : Policenama.com