कथा चोरल्याच्या आरोपामुळं ‘नेटफ्लिक्स’ची विश्वासार्हता धोक्यात, रायटर्सच्या युनियनं सांगितलं – ‘लॉकडाऊननंतर कारवाई होणार’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली तयार करण्यात आलेली ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सची वेब सीरिज बेताल रिलीजच्या खूप जवळ गेली होती. अशातच ही सीरिज आता नव्या वादात सापडली आहे. मराठी पटकथा लेख समीर वाडेकर आणि महेश गोसावी यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करत बेतालची स्टोरी त्यांच्या वेताळ सिनेमावरून चोरली आहे असं म्हटलं आहे. हे प्रकरण आता स्क्रीन रायटर्स असोसिएशन पर्यंतही पोहोचलं आहे. अद्याप या प्रकरणी नेटफ्लिक्सकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

वेताळ सिनेमा आणि नेटफ्लिक्सची बेताल या सीरिजमधील साम्य कोर्टासमोर सांगताना महेश म्हणाला, “या दोन्ही प्रोजेक्टमध्ये किमान 10 समानता आहेत. आमच्या स्टोरीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगाला जोडलं होतं. बेतालमध्येही ही स्टोरी ब्रिटीश काळासोबत जोडण्यात आली आहे. आमच्या स्टोरीत सेना एका फोक म्युझिकवर डान्स करते. असंच दृश्य बेतालच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

बेतालची स्टोरी ब्रिटेनमधून येऊन गेल्या 8 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या पॅट्रीक ग्राहम आणि सुहानी कुंवर यांनी लिहिली आहे. ही स्टोरी एका अशा ग्रुपभोवती फिरते जे सुरंगाचं खोदकाम करणाऱ्या बाजूला असणाऱ्या गावकऱ्यांना तिथून हटवत आहेत. समीरची स्टोरीही एका अशा पर्यावरणवादीच्या भोवती फिरते जो काही खोदकाम करणाऱ्या माणसांना रोखतो आहे जे तिथे राहणाऱ्या गावकऱ्यांना तिथून पळवू इच्छित आहेत. या सगळ्या तथ्यानंतर कोर्टानं त्यांची याचिका फेटाळत म्हटलं आहे की, दर जर स्टोरीमध्ये साम्य असेल तर सीरिजच्या निर्मात्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल.

समीर वाडेकर म्हणतो, “आम्ही आमची पटकथा अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये दाखवली आहे. शाहरुखची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्ये आम्ही ही सीरिज नव्हती दाखवली. त्यामुळं त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. परंतु आम्ही नेटफ्लिक्सवर मात्र केस करू. मला हेच कळत नाही की आमची स्टोरी इतर लोकांपर्यंत कशी पोहोचली.”

समीर वाडेकरची ही पटकथा स्क्रीन रायटर्स असोसिएशन (SWA)मध्येही रजिस्टर आहे. तिथंही या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे. एसडब्ल्यूएचे उपाध्यक्ष राजेश दुबे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, चिंता करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊन संपताच एसडब्ल्यूए या संदर्भात करावाई करेन. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

You might also like