…म्हणून विड्याच्या पानावर गणपती म्हणून सुपारी ठेवली जाते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज सर्वत्र मोठ्या आनंदात आणि भक्तीभावानं गणपती बाप्पांचं आगमन झालं. प्रत्येक शुभकार्यात बाप्पांना प्रथम पूजेचा मान असतो. घरातली पूजा असो किंवा मग लग्न समारंभ असो पूजा करताना विड्यानं पान ठेवलं जातं. या पानावर सुपारी ठेवली जाते. या सुपारीलाच गणपतीची सुपारी असं म्हटलं जातं. या सुपारीला असं का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक पूजेदरम्यान गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते. कोणतीही पोकळी नसणारं सुपारी हे पूर्ण फळ आहे. प्रत्येक पूजेत गणपतीची मुर्ती ठेवता येत नसल्यानं प्रत्येक पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रुपात पूजेत हजर होत असतो. याशिवाय सुपारी ही संस्कृती आणि मांगल्याचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीत सुपारीला महत्त्वाचं स्थान आहे. विवाहसोहळा, गणेशोत्सव, जागरण-गोंधळ, सत्यनारायण पूजा, दिवाळी, दसरा, वास्तुशांती अशा प्रत्येक शुभ कार्यात सुपारी ही ठेवली जाते. याशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्णच होत नाही.

पूजा कोणतीही असो. त्यात सर्वात पहिला मान असतो तो म्हणजे गणपतीचा. गणपतीच्या पूजनानंच कोणत्याही शुभकार्याचा श्रीगणेशा केला जातो. सुपारी केवळ फळ नाही तर त्याला गणपतीचं रूप मानलं जातं. गणपती म्हणून सुपारीची पूजा केली जाते. आजही सर्वत्र हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावेळी पान सुपारी देण्याची परंपरा सर्वत्र पाहायला मिळते. हेच कारण आहे की, विड्याच्या पानावर सुपारी ठेवली जाते.