‘या’ एका कारणामुळं महिलांचा कमी होतो ‘सेक्स’मधील रस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनेक महिलांमध्ये वयासोबत सेक्समधील उत्साह कमी होऊ लागतो. महिलांच्या लैंगिक इच्छांमध्ये होत असलेल्या बदलावंर अलिकडेच संशोधन करण्यात आले. हे संशोधन स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी केले आहे. संशोधनाचे लेखक आणि मेयो क्लिनिकमध्ये मेडिसिनच्या असोसिएट प्रोफेसर डॉक्टर जुलियाना क्लिंग यांनी संशोधनात महत्वाची माहिती दिली आहे.

डॉक्टर क्लिंग यांनी महिलांची लैंगिक इच्छा झोपेशी जोडली आहे. नव्या संशोधनानुसार, वाढत्या वयात चांगली झोप घेणे लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी सर्वात परिणामकारक उपाय आहे. संशोधकांना आढळले की, ज्या महिला चांगली झोप घेत नाहीत, त्यांच्यात लैंगिक समस्या निर्माण होण्याची शक्यता जवळपास दुप्पट असते. जसे की, लैंगिक इच्छा किंवा उत्तेजनामध्ये कमतरता होणे.

हे संशोधन 53 वर्ष वयाच्या 3,400पेक्षा जास्त महिलांवर करण्यात आले होते. यापैकी 75 टक्के महिलांची झोपण्याची सवय चांगली नव्हती, तर 54 टक्के महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची लैंगिक समस्या आढळून आली.

संशोधनात महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अभ्यासात आढळले की, ज्या महिला चांगली झोप घेत नव्हत्या, त्यांच्यात लैंगिक इच्छेची कमतरता होती. संशोधनकर्त्यांनी झोप आणि सेक्सला प्रभावित करणारी अन्य कारणे जसे की, मेनोपॉजच्या स्थिती बाबत सुद्धा माहिती घेतली.

संशोधनात सहभागी ज्या महिला रात्री 5 तासापेक्षा कमी झोप घेत होत्या, त्यांच्यात लैंगिक समस्या होण्याची शक्यता जास्त होती. डॉक्टर क्लिंग यांनी म्हटले, सेक्शुअल डिस्फंक्शन एक प्रकारची लैंगिक समस्या आहे, जिचा संबंध खराब झोपेशी आहे. यामुळे लैंगिक इच्छा, उत्तेजनामध्ये घट आणि प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना यासारख्या समस्या होतात. चांगली झोप न झाल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो आणि लैंगिक समस्या निर्माण होतात. म्हणून झोपेशी संबंधीत काही समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.