नवीन सरकार सत्तेत येताच धोक्यात ? सट्टेबाजांच्या अंदाजाने ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील निवडणुकांचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप सरकार स्थापनेबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अद्याप सरकार स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झालेली नाही. त्यामुळे राज्यात नेमके कोणाचे सरकार येणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सत्ता स्थापनेसाठी अनेक वेगवेगळी राजकीय समिकरणे जुळवून शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सट्टा बाजारात देखील मोठी उलाढाल होताना दिसून येत आहे. मुंबईतील सट्टा बाजारात सरकार कोण स्थापन करणार यावर सट्टा लावला जात आहे. यातच महाराष्ट्रात एका वर्षाच्या आत पुन्हा विधानसभा निवडणुका होणार यावरही सट्टा लावला जात असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. शुक्रवारी सट्टा बाजारात स्थिर सरकारचा भाव 20 रुपये होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच सध्याचे वातावरण पाहता जरी कोणाचे सरकार सत्तेत आले तरी ते काही महिनेच टिकेल असे सट्टेबाजांना वाटतं. त्यामुळे 2020 मध्ये राज्यात पुन्हा निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवर नोकरशहांचीसुद्धा नजर आहे. सध्या मुंबईचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांना सेवेत तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. ती 30 नोव्हेंबरला संपणार आहे. तेव्हा आणि आताही असंच म्हटलं जात आहे की, जर भाजपचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचे राहिले तर बर्वे यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते. राज्यात कोणाचे सरकार येते यावर बर्वे यांची मुदवाढ ठरणार आहे.

Visit : Policenama.com