काय सांगता ! होय, ‘देवा’च्या नावावर सुरू होतं सट्टेबाजीचं मोठं रॅकेट, छापा टाकून पोलिसांनी जप्त केली 4.25 कोटीची रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जयपूरच्या जुन्या शहर किशनपोल बाजारातून सट्टेबाजीतील आजवरची सर्वात मोठी ४.१९ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ४ बुकींकडून हे पैसे जप्त केले आहेत. त्यांच्याकडे दोन नोटा मोजण्याचे यंत्रदेखील होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यात पकडलेल्या ९ मोबाइल फोनवर सट्टेबाजीसाठी ३० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स बनवले होते. राजस्थानातील मोठ्या देवता आणि जयपूरच्या मोठ्या मंदिरांच्या नावावर हे सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्स बनवण्यात आले होते.

यासंदर्भात बोलताना जयपूरचे पोलीस आयुक्तालयाचे एसपी मेघ चंद मीणा म्हणाले की, दुबईत बसून सट्टेबाज व्हॉट्सअ‍ॅपवर सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असे. व कोड वर्डच्या साहाय्याने सट्टा लावत होते. मॅच झाल्यावर सट्टेबाजी जिंकणारा आणि त्यांच्यासाठी पोचवली जाणारी बुकींची रक्कम तो येथून पाठवत होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरातमधील राजकोटच्या रणधीरसिंग, अजमेरचा कृपालसिंग, झुंझूनूचा ईश्वरसिंग आणि जपयुरचा टोडरमल राठौर यांचा समावेश आहे.

यातील मुख्य सूत्रधार असलेला राकेश राजकोट दुबईत बसून देशभरातील सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याने डायमंड एक्सचेंज वेबसाईट नावाचा स्वत:चा ग्रुप तयार केला असून, ज्यात कोड वर्डद्वारे आयडी पासवर्ड च्या माध्यमातून सट्टा लावण्यात येत होता. व्हॉट्सअ‍ॅप गृपवरून तो आयपीएल दरम्यान गुजरात आणि राजस्थानमध्ये सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like