दररोज ‘फास्ट फूड’ खात असाल तर सावधान ! केवळ लठ्ठपणाच नाही तर होतात ‘हे’ 5 आजार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – फास्ट फूड हे आरोग्यास हानिकारक आहे. आजकाल लहान मोठे सर्वच जण फास्ट फूडचे शौकीन झालेले आहेत. फास्ट फूड खाल्याने फक्त वजनच वाढत नाही तर यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात. जाणून घ्या फास्ट फूडमुळे शरीराचे होणारे नुकसान..

1) केसांच्या समस्या –
फास्ट फूडमुळे आवश्यक पोषकद्रव्य मिळत नसल्याने याचा सर्वाधिक परिणाम केसांवर होतो. पोषकद्रव्ये न मिळाल्याने केस रुक्ष, निस्तेज होतात. तसेच मोठ्या प्रमाणात केस गळतात.

2) डायबेटिज –
फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे चयपचनाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तसेच शरीरातील इन्सुलिनचे कार्य बिघडते. त्यामुळे डायबेटिज होण्याचा धोका बळावतो.

3) त्वचेवर परिणाम –
नेहमी फास्ट फूड खाल्ल्याने त्याचा साहजिकच त्वचेवर परिणाम होतो. फास्ट फूडच्या सेवनाने शरीराचा हार्मोनल बॅलन्स बिघडतो आणि चेहऱ्यावर डाग पडतात, पिंपल्स येतात. त्यामुळे फास्ट फूड खाणे टाळावे.

4) झोप न येणे –
फास्ट फूड खाल्ल्याने मेंदूच्या न्यूरोकेमिकल प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे झोप लाकत नाही आणि चिडचिड होते.

5) पचनाचे विकार –
फास्ट फूडमध्ये बहुतांशी पदार्थ हे तळलेले असतात. त्यासाठी वापरले जाणारे तेल व मसाल्याचे पदार्थ यांमुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते. त्यामुळे फास्ट फूड खाणे टाळावेच.

Visit : Policenama.com