आमच्या ‘बापा’ला बोलाल तर खबरदार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूनम महाजन यांच्या वक्तव्यावरून त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. “आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही”. अशा प्रकारचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर वरून ट्विट केले आहे.

याबरोबरच , ”पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मैत्रीचे संबध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो”.असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी पूनम महाजन यांना दिला आहे.

नक्की काय म्हणाल्या होत्या पूनम महाजन

मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभ प्रसंगी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या , ‘शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल’ असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला.

यामुळे पोलीस आयु्क्तांच्या घरावर छापे : राजनाथ सिंह
World Cancer Day : कर्करोगाला हरवलेल्या शरद पवारांनी दिला कानमंत्र