सावधान ! मोबाईल उशाला ठेवून झोपणार्‍यांसाठी वाईट बातमी, गंभीर आजाराच्या धोक्याचे सावट

नवी दिल्ली : मोबाइल फोन सध्या लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. रात्री झोपताना सुद्धा बहुतांश लोक मोबाइल फोन आपल्या उशाला ठेवून झोपतात. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर तोबडतोब सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण तुमचा स्मार्टफोन तुम्हाला गंभीर आजार देत आहे.

ब्रिटनच्या एक्झिटर युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये हे समजले आहे की, स्मार्टफोनमधून उत्सर्जित होणार्‍या विकिरणांमुळे कॅन्सर आणि नपुंसकतेचा धोका वाढतो. आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च एजन्सीने स्मार्टफोनमधून निघणार्‍या इलेक्ट्रो मॅग्नेटिक विकिरणांना कार्सिनोजन म्हणजे कॅन्सरकारक तत्वांच्या श्रेणीत ठेवले आहे.

आयसीआरएने इशारा दिला आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर कान आणि मेंदूमध्ये ट्यूमर तयार होण्याचे कारण ठरू शकतो. पुढे जाऊन तो कॅन्सरचे रूप घेऊ शकतो. 2014 मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, स्मार्ट फोनमधून निघणार्‍या इलेक्ट्रो मॅग्नेटिक विकिरणांचा नपुंसकतेशी थेट संबंध आहे.

संशोधकांनी इशारा दिला की, खिशात स्मार्टफोन ठेवल्याने शुक्राणुंचे उत्पादन कमी होते. याशिवाय अंडाणुंना फलित करण्याची गतीसुद्धा संथ होते. जर तुम्ही फोन उशीच्या खाली ठेवून झोपत असाल तर तोबडतोब ही सवय सोडून द्या. असे केल्याने तुमचा स्मार्टफोन फुटू शकतो.

2017 मध्ये इस्त्रारायलच्या हायफा युनिव्हर्सिटीच्या संशोधनात म्हटले होते की, झोपण्याच्या अर्धातास अगोदर स्क्रीनचा वापर बंद केला पाहिजे. संशोधकांनी म्हटले होते की, स्मार्टफोन, कम्प्यूटर तसेच टीव्हीच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश ‘स्लीप हार्मोन’ मेलाटोनिनचे उत्पादन बाधित करतो. यामुळे लोकांना झोपेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात.