याद राखा ! ‘डांगडिंग’ करून वाहन चालवाल तर तुमच्या नावाचा ‘उध्दार’ पोलिसांच्या वेबसाईटवर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांसाठी खबरदारी घेण्याची घरज आहे. दारू पिउन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून वेळोवेळी वाहनचालकांची तपासणी केली जाते. पोलिसांनी पकडल्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह चा खटला न्यायालयात दाखवला जातो.

मात्र आता ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्यांची नावे औरंगाबाद पोलीस आयुक्तांच्या वेबसाईटवर झळकू शकतात. कारण पोलिसांनी नुकतीच जानेवारी ते एप्रिल दरम्यान झालेल्या ड्रंक अँड ड्राईवच्या केसेसमधील पकडलेल्यांची यादी वेबसाईटवर टाकली आहे.

दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून वाहतुक विभाग वारंवार कारवाई आणि उपक्रम राबविले. मद्यपींमुळे झालेल्या अपघातात अनेकांचे मृत्यू झाले आङेत. त्यामुळे वाहतुक पोलीस शहरातील विविध ठिकाणी ब्रेथ अनालायझर हातात घेऊन कारवाई करत उभे असतात.

दारू पिऊन गाडी चालविताना सापडला की, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जातो. तसेच त्यांच्याविरोधात न्यायालयात खटलाही दाखल केला जातो. औरंगाबाद पोलिसांनी जानेवारी ते एप्रिलदरम्यान कारवाई केली. तसेच आताही कारवाई सुरु आहे.

६३ जणांची नावे वेबसाईवर

वाहतुक पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल दरम्यान एकूण ६३ जणांवर कारवाई केली आहे. या ६३ जणांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी पोलिसांनी या वाहनचालकांची नावे वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पोलिसांनी औरंगाबाद आय़ुक्तालयाच्या वेबसाईटवर जानेवारी ते एप्रिल दरम्यान कारवाई केलेल्या ६३ जणांची यादी नावासंह वेबसाईटवर टाकली आहेत. त्यासोबतच कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचेही नाव यादीत आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

नेत्रदानात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम

ज्यूनियर डॉक्टरांना न झेपणारे काम देणे अयोग्य : डॉ. सागर मुंदडा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like