सावधान…नेपाळी ‘वॉचमेन’ ठेवताय

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

कमी पैश्यामध्ये जास्त वेळ काम करणारा वॉचमेन ठेवणाऱ्या उच्चभ्रू, श्रीमंतांची संख्या मोठी आहे. हाऊस मौज किंवा इतर ठिकाणी हजारो रूपये खर्च करणारे स्वतःच्या घरासाठी सुरक्षेसाठी कमीत कमी पगारातील नेपाळी वॉचमेन नेमतात. हेच वॉचमेन योग्य संधी साधुन घर साफ करुन स्वताचा उद्देश सफल करतात.

निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ दिवसांपूर्वी एका व्यवसायिकाच्या बंगल्यात नेपाळी वॉचमेनने करोड़ो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलिस ठाण्यापासून ह्क्केच्या अंतरावर असलेल्या बंगल्यातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गावी गेले असताना काही महिन्यांपूर्वी नेमलेल्या नेपाळी वॉचमेनने साथीदारांच्या मदतीने घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरुन नेले. पोलिसांनी तपास सुरु केला, दरम्यान मध्यप्रदेश येथे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने वॉचमन आणि त्याच्या दोन साथीदाराना पकडले असून त्यांच्याकडून काही ऐवज जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f9e83da-787f-11e8-9342-6b2458387b15′]

पोलिसांनी तपास केला असता चोरी केलेला वॉचमन मित्राच्या ओळखीतुन ठेवण्यात आला असल्याचे समोर आले. याची कोणतीच माहिती किंवा चौकशी न करता त्याला कामावर ठेवले होते.

मुख्य चोरटा फरार

व्यवसायिकाच्या बंगल्यात चोरी करुन कोट्यवधी रूपये चोरण्याचा प्रयत्न चार नेपाळी वॉचमन यांनी केला. दरम्यान घरात काही कोटी रुपयांची रक्कम असल्याचे समजल्याने यांनी चोरी केली. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडून फक्त 20 ते 25 टक्के ऐवज जप्त केला आहे. तर 70 ते 75 टक्के ऐवज एका चोरट्याकडे असून तो फरार झाला आहे. तो पुण्यातून फरार झाला असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

आणखी एक प्रकार

निगडी प्रधिकरण येथील सुनील विनायक शिंपी (47, रा. सेक्टर नंबर 28, प्राधिकरण) यांच्या घरातून रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असा 40 हजार रुपयांचा ऐवज वॉचमन दीपक जोशी (नेपाळी) याने चोरुन नेला. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेआकरा ते रात्री बारा दरम्यान घडला. जोशी याने सेफ्टी दरवाजाचे लॉक उचकटून कपाटातील ऐवज चोरुन नेला.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f01b8eb-787f-11e8-930c-cfb3f44958da’]

पोलिसांचे आवाहन

निगडी तसेच शहरातील इतर ठिकाणी नेपाळी चोरट्यांनी चोरी केल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत, परवानाधारक एजन्सी कडून वॉचमेन ठेवावेत. तसेच त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. कमी पगारासाठी लाखोंची जोखीम पत्करु नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.