कामाची गोष्ट ! तुमच्या ‘आधार’ कार्डचा गैरवापर तर नाही ना होत ?, बचावासाठी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सर्वात महत्वपूर्ण डॉक्युमेंट आधार कार्ड आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्या आधार कार्डच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा दुरूपयोग होणार नाही यासाठी सावध राहिले पाहिजे. भारत सरकार सुद्धा नागरिकांच्या आधार सुरक्षेसाठी पावले उचलत आहे. जेणेकरून डेटाचा चुकीचा वापर होणार नाही. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी सोपी पद्धत ही आहे की ते लॉक करावे.

आधार लॉक करण्याचा अर्थ आहे याच्या 12 डिजिटच्या संख्येचा आणि याच्या जागी 16 डिजिटच्या वर्च्युअल आयडीचा वापर कोणत्याही प्रकारच्या जरूरी ऑथेन्टिकेशनसाठी केल जाणार नाही. जेव्हा कुणी व्यक्ती एकदा आधार लॉक करतो, तेव्हा त्यानंतर युआयडी, युआयडी टोकन इत्यादीसाठी ऑथेन्टिकेशन प्रोसेस होणार नाही. यामध्ये बायोमेट्रिक, डेमोग्राफिक आणि ओटीपी बेस्ड ऑथेन्टिकेशन सुद्धा होणार नाही. जर एखाद्या नागरिकांला आपला युनिक आयडी अनलॉक करायचा असेल तर आपल्या रेसिडेंट पोर्टलवर जाऊन अनलॉक करू शकतो. अनलॉकिंगनंतर सर्व प्रकारच्या ऑथेन्टिकेशन प्रोसेस पूर्ण होऊ शकतात.

आधार धारकाकडे बायोमेट्रिक्स लॉक करण्याचा सुद्धा पर्याय आहे. बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करण्याची एक अशी सर्व्हिस आहे, ज्यामध्ये आधार होल्डर काही काळासाठी आपले बायोमेट्रिक लॉक करतो आणि गरज भासल्यास अनलॉक करतो. या सुविधेचा हेतू हा आहे की, बायोमेट्रिक डेटाची प्रायव्हसी सुरक्षित ठेवली जावी.

बायोमेट्रिक लॉक होण्याने हे पक्के होते की, फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांच्या बुबुळांशी संबंधीत डेटाचा चुकीचा वापर होणार नाही. आधार कार्ड होल्डर सहजपणे आपले बायोमेट्रिक अनलॉक सुद्धा करू शकतो.

कसे कराल आधार लॉक ?
युनिक आयडेंटिफिकेशनल लॉक करण्यासाठी व्यक्तीकडे 16 डिजिटचा व्हर्च्युअल आयडी नंबर असला पाहिजे. जर कुणाकडे व्हीआयडी नसेल तर तो एसएमएसद्वारे जनरेट सुद्धा करता येतो. यासाठी मॅसेज बॉक्समध्ये जीव्हीआयडी इंग्रजीत लिहून स्पेसनंतर आधारचे शेवटचे 4 अंक किंवा 8 डिजिट लिहावेत. यानंतर मॅसेजला 1947 वर पाठवावे.

काय आहे आधार लॉक आणि अनलॉक प्रक्रिया?
रेसिडेंट पोर्टलवर जाऊन माय आधारच्या सेक्शनमध्ये जा आणि येथे आधार सर्व्हिसेसमध्ये लॉक, अनलॉकवर क्लिक करा. यामध्ये युआयडी लॉक रेडियो बटनवर क्लिक करा आणि आधार नंबर टाका. यानंतर यामध्ये पूर्ण नाव, पिनकोड आणि लेटेस्ट डिटेल टाकल्यानंतर सिक्युरिटी कोड भरा. यानंतर ओटीपीसाठी क्लिक करा किंवा टीओपीटीसाठी सीलेक्ट करा सबमिट बटनवर क्लिक करा.

आधार बायोमेट्रिक्सला कसे लॉक किंवा अनलॉक कराल?
यासाठी सुद्धा तुम्हाला रेसिडेंट पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर माय आधार सेक्शनमध्ये गेल्यानंतर आधार सर्व्हिसमध्ये जा. यामध्ये लॉक/अनलॉकचा पर्याय दिला असेल. पुढील स्टेपमध्ये आपला आधार नंबर किंवा व्हीआयडी नंबर टाका. कॅप्चा कोड टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी मागवा. ओटीपी टाकल्यानंतर तो सबमिट करा. इतके केल्यानंतर तुमचे बायोमेट्रिक लॉक होईल. आधार बोयोमेट्रिक अनलॉक करण्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस फॉलो करा.