RBI चा इशारा ! जर तुम्ही या गोष्टी मानल्या नाही तर रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लोकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक मोहीम राबविण्यात येत आहेत. तसेच आरबीआयने अनेकदा ऑनलाईन बँकिंगबाबत सावध केले आहे. परंतु ज्या वेगाने लोक इंटरनेट बँकिंगच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, त्याचप्रमाणे बँकेतील घोटाळेही वाढत आहेत. या अभिनयामध्ये रिझर्व्ह बँक ऑनलाईन फसवणूक आणि बँकिंगशी संबंधित सर्व व्यवहारांची माहिती सर्वसामान्यांना देत आहे. तर तुम्हालाही पैश्याच्या फसवणूकीपासून वाचवायचे असतील तर या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील रिझर्व्ह बँकेच्या नावे काही ई-मेल आले तर ते टाळण्याचा सल्ला दिला बँकेकडून देण्यात आला आहे. आरबीआयच्या नावाने येणारे ई- मेल आपल्या बँक खात्यात जमा केलेली कमाई साफ करू शकतात.

अशाप्रकारे असतात ई-मेल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की त्यांच्या नावावर लोकांना काही बनावट ई- मेल पाठविले जातात. त्या ई-मेल मध्ये आपण बक्षिसे जिंकली ते बक्षिस मिळवण्यासाठी तुम्हला प्रोसेसिंग फी अन्य चार्जेस भरण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले की असे ईमेल आणि संदेश त्याच्या वतीने कधीही पाठविले जात नाहीत. आरबीआयने म्हटले आहे की विदेशातून येणारी लॉटरी किंवा पैसे जिंकणे यासारखी कोणतीही माहिती ई- मेलद्वारे किंवा एसएमएसद्वारे पाठविली जात नाही.

हे सगळं कसे ओळखावे
रिझर्व्ह बँकेच्या नावावर बनावट ई- मेल पाठविणारे ‘आरबीआय’ आणि ‘रिझर्व्ह बँक’ अशी नावे वापरतात, असे सेंट्रल बँकेने म्हटले आहे. ज्यामुळे लोक त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. परंतु जर आपल्याला अशी फसवणूक टाळायची असेल तर ईमेल कोणत्या पत्त्यावरून आला हे निश्चितपणे जाणून घ्या. आपल्याला काही संशयास्पद वाटल्यास त्या ईमेलवरील कोणतीही माहिती आपल्या वतीने सामायिक करू नका. अशा प्रकारच्या ई- मेल आणि एसएमएसला प्रत्युत्तर देऊ नका असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.