SBI ने कोट्यावधी ग्राहकांना केलं अलर्ट! 1 SMS रिकामं करू शकतात तुमचं अकाऊंट, दिल्या ‘या’ खास सूचना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ऑनलाइन फसवणूकीची प्रकरणे सतत वाढत आहेत. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सूचना जारी केली आहे. एसबीआयने एका ट्विटद्वारे, कशा पद्धतीने लोक एका नव्या व्हायरसमुळे फसू शकतात आणि माहिती असूनही अलर्ट नाहीत, चूक करतात हे सांगितले आहे. मोठ्या क्रिएटीव्ह पद्धतीने एसबीआयने स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वीलोक अशा तीन भागात याची विभागणी केली आहे.

 

यामध्ये पाताळ लोकातील यूजर्सना सरबेरस ट्रोजन मालवेयरद्वारे ऑनलाईन बँकिंग करणारे इन्फेक्टेड यूजर्सना पाताळ लोक म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे की, स्वर्गलोक असे यूजर्स आहेत, ज्यांना नेहमी फ्रॉडाचा धोका असतो. पृथ्वीलोकच्या युजर्संना म्हटले आहे, ज्यांना मालवेयर आणि धोक्याची माहिती आहे आणि तरीही ते अनोळखी लिंकवर क्लिक करतात. तर, पाताळ लोकचे यूजर्स इन्फेक्टेड झाले आहेत.

आढळून आलेला ट्रोजन मालवेयर यूजर्सच्या बँकिंग डिटेल्सची चोरी करण्याचे काम करतो. या डिटेल्समध्ये क्रेडिट कार्ड नंबर्स, सीव्हीव्ही आणि अन्य डेटा आहे. याशिवाय ट्रोजनच्या मदतीने विक्टिम्सला फसवल्यानंतर त्यांची वैयक्तिक माहिती आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन डिटेल्ससुद्धा चोरी करता येऊ शकतात. कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान फ्रॉड करणारे सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. यूजर्सना एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि केवळ प्ले स्टोअरमधूनच अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला जात आहे.

सरबेरस नावाच्या धोकादायक मालवेयरच्या मदतीने अकाऊंट होल्डर्सला फसवले जाते. हा मालवेयर फेक एसएमएस पाठवून यूजर्सना मोठ्या ऑफर्सची माहिती देतो आणि अनोळखी लिंक्सवर क्लिक केल्यानंतर अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर त्यांची फसवणूक करतो. अशा अ‍ॅप्सचा हेतू अकाऊंट होल्डर्सचे पैसे चोरणे हाच असतो.