वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वाहतुकीचे नियम मोडून आपण पोलीसांच्या नजरेतुन वाचू असा विचार करणाऱ्यांनी आता सावधान, कारण देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात नवीन ड्राइविंग लाइसेंस आणि गाडीची आरसी बदलणार असून रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार, १ ऑक्टोंबर पासुन संपुर्ण देशात एक सारखे ड्राइविंग लाइसेंस बनवले जाणाार आहेत. त्यातून वाहतुकीचे उल्लंगन केल्यास ते लपू शकणार नाही.

ड्रायविंग लायसन्स आणि आरसी आता याचे रंग,लुक, डिजाइन आणि सिक्यॉरिटी फीचर्स हे सर्व सारखेच असणार आहेत. परंतु त्यात स्मार्ट डीएल  आणि आरसीमध्ये प्रामुख्याने माइक्रोचिप क्युआर कोड असणार आहे.

क्युआर कोडच्या माध्यमातुन केंद्रीय ऑनलाईन डेटाबेसव्दारे  चालक किंवा वाहन यांचे मागील रिकॉर्ड एका डिवाइसच्या माध्यमातुन वाचले जाणार आहे. तसेच वाहतुक पोलीसांना त्यांच्या जवळ असलेल्या डिवाइसमध्ये कार्ड टाकताच किंवा क्युआर कोड स्कॅन करून करताच गाडी व चालक यांची संपुर्ण माहिती मिळणार आहे.

रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार , १ ऑक्टोंबर पासुन संपुर्ण देशात एक सारखे ड्राइविंग लाइसेंस बनवले जाणाार आहेत.

या अधिसुचने नुसार देशातील प्रत्येक राज्याचे ड्राइविंग लाइसेंस आणि रजिस्ट्रेशन प्रमाण पत्राचा फॉर्मेट एक सारखा असणार आहे .तसेच लाइसेंस व आरसी याचा रंग देखील सारखा असेल. प्रामुख्याने मेट्रो रेल्वे व एटीएम च्या स्मार्ट कार्डमध्ये वापरली जाणाऱ्या एनएफसी या फिचरमुळे कोणत्याही गाडीची व चालकाची मागील १० वर्षातील संपुर्ण माहिती समोर येणार आहे. ही एनएफसी सुविधा जाते.

चीप व एनएफसी सुविधेला अनिवार्य करण्याचा प्रस्ताव होता,परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारांना पर्याय ठेवण्याचा निर्णय दिला आहे. देशात दररोज ३२,००० डीएल घेतले जातात किंवा त्याचे रीन्यू केले जाते. तसेच दररोज कमीतकमी ४३,००० गाड्या रजिस्टर होतात किंवा रि-रजिस्टर केल्या जातात.

या नवीन डीएल किंवा आरसीमध्ये १५-२० रुपये पेक्षा जास्त खर्च नसणार आहे . ट्रांसपोर्ट मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते या नवीन बदलामुळे वाहतुक पोलीसांचा वेळ वाचणार आहे.