सावधान ! ‘सिम स्वॅपिंग’ने घातला जातोय तुमच्या बँकेतील पैशावर डल्ला

मुंबई : वृत्तसंस्था – साईबर क्राईमला अनेक पद्धतीने आळा घालण्याचा प्रयत्न करूनही हे गुन्हे काही केल्या कमी होत नाही. याऊलट हॅकर्स आणि स्कॅमर अनेक नवीन युक्त्या आजमावत असतात. पूर्वी एटीम क्लोनिंग व्ह्ययची. बँकेतून बोलतोय म्हणून फोन करून माहिती विचारून तुमच्या पैशावर डल्ला मारला जायचा. आता हॅकर्सनी नवीन युक्ती शोधून काढली आहे. ती म्हणजे सिम स्वॅपिंग. आता या नव्या युक्तीद्वारे तुमच्या बँकेतील पैशावर डल्ला मारला जातो. यामध्ये डुप्लिकेट सिम बनवून तुम्हाला लुटले जाते.
यामध्ये तुम्हाला एक काॅल येतो. आपण आपण सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून बोलत असल्याचे भासवले जाते. कॉल ड्रॉप, इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करीत तुमची माहिती काढून घेतली जाते. बोलण्यातून ती व्यक्ती युजरचा २० डिजिटचा युनिक नंबर मिळवतो. जो सिम कार्डच्या मागे असतो. त्यानंतर, १ नंबर प्रेस करण्यास सांगितले जाते. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुमच्या सिमचे स्वॅपिंग केले जाते.
अशा प्रकारे स्वॅपिंगची प्रकिया पूर्ण होते. यानंतर मात्र तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर रेंज नसल्याचे चित्र पाहायला मिळते. दरम्यान स्वॅप केलेल्या म्हणजेच तयार केलेल्या डुप्लिकेट सिमवर सिग्नल येतात. जे सिर काॅल करणाऱ्या व्यक्तीकडे असते. हुतांश प्रकरणात स्कॅमरकडे आपला बँकिंग आयडी आणि पासवर्ड असतो. आता त्यांना ओटीपीची गरज असते. तो सिम नंबरवर येतो. ओटीपी येताच आपल्या बँक अकाउंटमधून रक्कम ट्रान्सफर केली जाते. तुमच्या पैशावर डल्ला मारला जातो. युरोप व अमेरिकेत २०१३ मध्ये सिम स्वॅपिंगच्या अनेक घटना घडल्या. सायबर लॉ फाउंडेशनच्या माहितीनुसार 2018 मध्ये भारतात तब्बल 200 कोटी रुपये या पद्धतीने लंपास करण्यात आले आहे. हा सायबर क्राइमचा प्रकार आहे.
अनेकदा या गोष्टीचा थांगपत्ताही तुम्हाल लागत नसतो. त्यामुळे तुम्हाला बँकेकडे तक्रार करता येत नाही. जेव्हा तुम्हाला ही घटना कळते तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळेच आता प्रत्येक बँक खात्यात इमेल अलर्ट सुविधा दिली पाहिजे. कारण जर अचानक सिम कार्ड बंद झाले, तर कमीत कमी इमेलच्या माध्यमातून तरी आपल्याला समजू शकते की, आपल्या खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैस काढले आहेत. असे झाल्यास तुम्ही तात्काळ बँकेकडे तक्रार करू शकता. योग्य ते पाऊल उचलू शकता.
सर्वात महत्वाचे म्हणजे सिम स्वॅपिंगचे काम जास्त करुन शुक्रवार किंवा शनिवारी केले जाते. काही वेळा सुट्टींमध्येही अशी फसवणूक होते. याचे कारण असे की, सुट्टीच्या दिवशी बँक आणि टेलिकॉम कंपनीला संपर्क साधताना आपल्याला अडचणी येतात. यामुळे तुमचे सिम कार्ड जर बंद झाले तर सावधान राहा आणि तातडीने बँकेचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us