महिलांनो सावधान ! ऑनलाईन शॉपिंग करणार्‍या 22 हजार जणांची आतापर्यंत झालीय फसवणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट ऑनलाईन शॉपिंग साईटच्या सहाय्याने देशातील
२२ हजार नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. आशिष अहिर (३२) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.

आरोपी आशिषला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. आशिषने लंडनमधून आयटीचे शिक्षण घेतले आहे. shopiiee.com या संकेतस्थळाबाबत पोलिसांना अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर तपास केला असता आरोपींनी २२ हजार व्यक्तींची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. संकेतस्थळांच्या माध्यमातून महिलांचे कपडे, खोटे दागिने, घरगुती वस्तूंची विक्री केली जात होती. फेसबुकच्या सहाय्याने त्याची जाहिरातही करण्यात येत होती.

सुरत मधून आरोपी हे संकेतस्थळ चालवत असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला अटक करुन मुंबईत आणण्यात आले. अशा आणखी ११ बनावट संकेतस्थळांची ओळख पटली आहे. या संकेतस्थळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

फसवणूक होणारी संकेतस्थळे

१. https://white-stones.in/,

२. https://jollyfashion.in/,

३. https://fabricmaniaa.com/,

४. https://takesaree.com/,

५. https://www.assuredkart.in,

६. https://republicsaleoffers.myshopify.com/,

७. https://fabricwibes.com/,

८. https://www.thefabricshome.com/,

९. https://thermoclassic.site/,

१०. https://kasmira.in/

११. https://efinancetix.com/,

पोलिसांचे आवाहन

ऑनलाईन शॉपिंग करताना कॅश ऑन डिलेव्हरी (सीओडी) हे सिलेक्ट करूनच ऑनलाईन शॉपिंग करावी, secure gateway निवडावा, मोठ्या प्रमाणावर सूट देणाऱ्या वेबसाईटवर खरेदी करताना खबरदारी घ्यावी.