सावधान ! सोशल मिडियावर मित्रांकडून होते तुमची माहिती लीक

मुंबई : वृत्तसंस्था – सोशल मीडियाच्या आजच्या युगात तुमच्या कोणत्याच गोष्टी लपून राहत नाही. एका अभ्यासातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. तुमचे मित्र थोडीथोडकी नव्हे तर तुमची 95 टक्के माहिती लीक करत असल्याचे या अभ्यासातून उघड झाले आहे. तुमचे जिगरी मित्रच तुम्हाला सोशल मिडियावर उघडे पाडत असल्याचे समजत आहे. तुम्ही सोशल मिडियावर असा किंवा नसाल याचा काहीही फरक पडत नाही. तुमची माहिती लीक होत आहे. वाचून थोडा धक्का बसला असेल पण हे खरे आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, एखादी व्यक्ती सोशल मिडियावरील खाते डिलीट करत असेल किंवा ती व्यक्ती सोशल मिडिया वापरतच नसेल तरीही त्याची माहिती चोरली जात आहे. अमेरिकेचे वरमोन्ट विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचे एडलेड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी हा दावा केल्याचे समजत आहे. या अभ्यासकांनी त्यांचा संशाेधन अहवाल ‘नेचर ह्यूमन बिहेवियर’ नावाच्या मॅग्झीनमध्ये प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासासाठी त्यांनी 13905 ट्विटरवरील युजर्सच्या 3 कोटींपेक्षा जास्त ट्विटची माहिती तपासली आहे. तुमचा खासगीपणा सोशल मिडियासाठी सेकंड हँड स्मोक सारखा असल्याचे म्हटले आहे, जो तुमच्या आसपासच्या लोकांकडून नियंत्रित केली जात आहे असे त्यांनी म्हटले आहे.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु असेही समजत आहे की, फेसबुकवर काही टूल अशीही आहेत जी तुम्ही कोणत्या कंपनीचा टीशर्ट घातला आहे, तशाच प्रकारचा टीशर्ट घालणारे आणखी किती जण आहेत याचीही माहिती मिळवता येते. फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर अकाऊंट खोलत असताना तुम्हाला वाटते की आपलीच माहिती दिली जाते. पण याबरोबर कळत नकळत मित्रांचीही माहिती दिली जाते.

तुम्हाला काय आवडते काय नाही याचीही माहिती घेतल्यानंतर तुमच्या मित्रांना काय आवडते याची माहिती सोशल मीडियावरून गोळा केला जाते. कारण एखादी गोष्ट घेतल्यास ती कोणाचीतरी पाहून घेतली जाते किंवा त्याला खिजवण्यासाठी, इर्शेने दुसरी चांगली वस्तू घेतली जाते. याबाबतचे फोटोही टाकले जातात. यावरून ही माहिती गोळा करता येते असेही समजत आहे.

Loading...
You might also like