Bhabiji Ghar Par Hai | ’भाभी जी घर पर हैं’ मधील ‘मलखान’चे निधन, शूटींगला जाण्यापूर्वी क्रिकेट खेळताना घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bhabiji Ghar Par Hai | टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ’भाभीजी घर पर है’ मधील अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) म्हणजेच मलखानचे निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 41 वर्षीय दीपेशच्या आकस्मिक निधनामुळे शो चे स्टार्स आणि क्रू मेंबर्स शोकसागरात बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश शनिवारी सकाळी क्रिकेट खेळत होता. यावेळी तो अचानक जमिनीवर पडला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Bhabiji Ghar Par Hai)

 

रोहिताश गौर यांनी व्यक्त केला शोक
या मालिकेत मोहनलाल तिवारी यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहितेश गौर यांनी दीपेश भानच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, आज आम्हाला शूटला जायला थोडा उशीर झाला. त्यामुळे मला वाटते की तो थेट त्याच्या जिमच्या मागे क्रिकेट खेळायला गेला. हे त्याचे फिटनेस रूटीन होता. मात्र खेळत असताना तो अचानक बेशुद्ध पडला. आम्हा सर्वांसाठी हा मोठा धक्का होता.

 

रोहितश पुढे म्हणाले, दीपेश अशा लोकांपैकी एक होता ज्यांनी त्याच्या आरोग्याची खूप काळजी घेतली. तो फिटनेस फ्रीक होता. माझ्या भावना कशा व्यक्त करायच्या हे मला कळत नाही. आम्ही सर्व, आमची संपूर्ण टीम सध्या त्याच्या घरी आहोत. (Bhabiji Ghar Par Hai)

प्रोड्युसर म्हणाले, कुटुंबातील सदस्य होता दीपेश
रोहिताश व्यतिरिक्त ’भाभीजी घर पर हैं’ या मालिकेचे निर्माते संजय आणि बिनाफर कोहली यांनीही दीपेशच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, दीपेश भानच्या आकस्मिक निधनाने आम्हा सर्वांना खूप दु:ख आणि धक्का बसला आहे. भाभीजी घर पर हैं शो चा तो सर्वात डेडीकेटेड अभिनेत्यांपैकी एक होता. तो आमच्या कुटुंबासारखा होता. आम्हा सर्वांना त्याची खूप आठवण येईल. त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

 

मागे सोडून गेला पत्नी व दीड वर्षाचा मुलगा
दीपेश भान याला मलखान या मजेशीर व्यक्तिरेखेसाठी ओळखले जात होते. ’भाभीजी घर पर हैं’ व्यतिरिक्त त्याने
’कॉमेडी का किंग कौन’, ’कॉमेडी क्लब’, ’भूतवाला’, ’एफआयआर’ आणि ’सुन यार चिल मार’ सारख्या शोमध्ये काम केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत शिक्षण घेतल्यानंतर 2005 साली दीपेश मुंबईत आला.
मे 2019 रोजी दिल्लीत त्याचे लग्न झाले. जानेवारी 2021 मध्ये दिपेश एका मुलाचा पिता झाला.

 

Web Title :- Bhabiji Ghar Par Hai | bhabiji ghar par hai malkhan actor deepesh bhan passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे शहरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

 

Shivsena | शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती, परंतु…, शिवसेनेने केला खुलासा

 

Shinde Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यातील गंभीर प्रकरणासह राज्यातील ‘या’ 2 केसेस CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश?