विहिरीतून निघालेल्या गूढ आवाजामुळे येत होती कंपन, गावकरी भयभीत होऊन सोडू लागले परिसर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील भदोहीमध्ये एका विचित्र घटना समोर आली आहे. येथील पिंपरी गावामध्ये एका विहिरीतून विचित्र आवाजासह सतत कंपन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गावकरी भयभीत होऊन गावातून पलायन करत आहेत. प्रशासनाने देखील सतर्कता म्हणून जवळपासच्या नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

गावच्या सरपंचानी दिलेल्या माहितीनुसार,  सार्वजनिक विहिरीत बनलेल्या या सुरंगामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे विहिरीतून अशा प्रकारचे आवाज येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भदोहीचे  तहसीलदार बीडी गुप्ता यांनी आसपासच्या नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश दिले असून विहिरीभोवती सुरक्षा व्यवस्था म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, या विहिरीतील सुरंग किती मोठी आहे याचा अंदाज लावणे अवघड असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत हि सुरंग पूर्ण बुजत नाही तोपर्यंत प्रशासन देखील काहीही करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यासाठी प्रशासनाकडे  कोणताही निधी नसून आम्ही प्रयत्न करत आहोत.

Visit : Policenama.com