भद्रावती : भाजपातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असून या अत्याचारांच्या निषेधार्थ उद्या दि. १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता येथील तहसील कार्यालयावर भाजपाचा मोर्चा धडकणार आहे.

सदर मोर्चा माजी मंत्री तथा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री संजय गजपुरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ब्रिझभुषण पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार आहे.

भद्रावती तालुक्यातील भाजपा, भाजपा महिला आघाडी, युवा मोर्चा, विविध आघाड्यांचे पदाधिकारी – कार्यकर्ते, जि. प. ,पं .स. सदस्य व नगरसेवक यांनी सकाळी ११ वाजता पेट्रोल पंप चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा, महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या तालुका व शहर कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

लाडके नेतृत्व जिल्हाध्यक्ष मा. देवरावजी भोंगळे, महामंत्री संजयजी गजपुरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषणजी पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात तीव्र आंदोलन करायचे आहे.