भद्रावती पोलिसांनी आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या, 11.5 लाखाचा माल जप्त तर दोघांना अटक

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –   दारू बंदि असलेल्या चंद्रपुर जिल्हात लाॅकडाऊन असतांनाही मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असुन भद्रावती पोलिसांनी दि.6 सप्टेंबर रोजी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या कडून साडेअकरा लाखांचा मुद्दे माल जप्त केला आहे.

याबाबत पोलिस सुञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.6 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता दारू चालु असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका येथून एक काळया रंगाची रेनाॅल्ड डस्टर कार क्रमांक MH26, AF, 7474 हि अवैध रित्या चंद्रपुरला दारू घेवून जात आहे. अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी पेट्रोल पंप चौकात नाका बंदि केली असता सदर कार अडविण्यात आली. तेथे कारची झडती घेतली असता कार च्या डिक्कीत इंपेरियल विदेशी दारू 144 बाॅटल्स, राॅयल स्टॅग विदेशी दारू चे 24 बंपर, हायवर्ड बियर च्या 120 बाॅटल्स अशी एकूण 1 लाख 34 हजार 400 रू किमतीची दारू जप्त करण्यात आली. तसेच 20 हजार रुपये किमती चे दोन भ्रमणध्वनी संच व 10 लाख रूपये कीमतीची डस्टर कार कार असा एकुण 11 लाख 54 हजार 400 रू किमतीच्या मुद्दे माल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अमोल भास्कर भंडारे (24), व मुर्गन सुंदरराज कोंडर (41)रा. बल्लारशा या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध दारू बंदि कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनिल सिंग पवार, पोलिस शिपाई सचिन गुरूनुले, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, निकेश ढेंगे यांनी केली.