भद्रावती : शिवानी दानी यांचे भद्रावतीत जंगी स्वागत

भद्रावती- भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश महामंञी शिवानी दानी यांचे भद्रावतीत दि.24 नोव्हेंबर रोजी स्थानिक भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यातर्फे येथील पेट्रोलपंप चौकात जंगी स्वागत करण्यात आले.

Advt.

शिवानी दानी ह्या संदिप जोशी यांच्या प्रचारा निमित्त बल्लारपूर येथे आयोजित मेळाव्याला उपस्थित राहण्याकरिता जात होत्या. यावेळी फटाके फोडून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, उपाध्यक्ष इम्रान खान, पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती विद्या कांबळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण सातपुते, शहर महामंञी किशोर गोवारदिपे, अमित गुंडावार, केतन शिंदे, योगेश गाडगे, तेजस कुंभारे, गोलु खोब्रागडे, तोसिफ शेख, सचिन कवरासे, लता भोयर, प्रणिता शेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पञकारांशी बोलताना शिवानी दानी म्हणाल्या की, दि.1 डिसेंबर ला होणार्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकी करीता संदिप जोशी यांचा प्रचारा साठी आली असून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता माझा प्रवास सुरू आहे. येत्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल हे आम्ही युवा मोर्चा तर्फे दाखवू देऊ असे त्या म्हणाल्या.