Coronavirus : पोटात 5 महिन्याचं बाळ असताना देखील नर्सशी ‘कोरोना’शी ‘लढाई’, म्हणाली – ‘संकटात नाही सोडू शकत मैदान’

भागलपुर : वृत्तसंस्था – “एक वेगळाच प्रसंग होता. एकीकडे गर्भाशयात पाच महिन्यांचे मुल तर दुसरीकडे कोरोना विरुध्द लढाई चालू होती. मी हे युद्ध सोडून जायची कल्पनाही करू शकत नाही. माझी इच्छा होती की जेव्हा भविष्यात कोरोना योद्धांची चर्चा होईल तेव्हा त्यात माझे नाव बघून माझ्या होणाऱ्या बाळाचाही गौरव होईल. शेवटी, गर्भाशयात वाढणाऱ्या ममतेने कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा दिली.”

हे सांगताना पेशाने नर्स असलेल्या शांती कुमारी भावुक झाल्या. त्या म्हणाल्या कि कुटुंबाची सुरक्षा आणि कर्तव्य यामध्ये एक काहीतरी निवडणे सोपे नव्हते, पण आता कोणतीही अडचण नाही, भागलपूर जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एएनएम (ऑक्जिलरी नर्सिंग मिडवाइफ) शांती कुमारी आता रुग्णांची देखरेख करत आहेत.

सुट्टी देऊनही काम करत राहिल्या शांती
शांती यांचे लग्न नोव्हेंबरमध्ये भागलपूरच्या नाथनगर येथे राहणाऱ्या निरंजन कुमारसह झाले होते. पोटात पाच महिन्याचे बाळ देखील आहे. परिस्थिती बघता वरिष्ठ अधिकाऱ्याने सुट्टीवर जाण्यास सांगितले होते, पण शांती यांची उत्कटता त्यांना मैदान सोडण्यास परवानगी देत नव्हती. कुटुंबानेही साथ दिली आणि शांती कर्तव्य मार्गावर चालत राहिल्या.

म्हणाल्या – दुखी लोकांना मदत करण्यात जीवनाची सार्थकता
शांती चार वर्षांपासून नोकरी करत आहेत. त्यांना दुखी लोकांना मदत करायला आवडते. जीवनाची सार्थकता समजते. त्यांच्यासारख्या लोकांची कोरोनाच्या महामारी वेळी आवश्यकता आहे. हिम्मत आणि धैर्याने कोरोनाबद्दल लोकांना जागरूक केल्यावर कोरोनाचा पराभव निश्चित आहे. त्या आरोग्य विभागाच्या पथकासह दिवसभर गावागावात जाऊन लोकांची तपासणी करतात. तसेच कोरोनापासून बचाव करण्याबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्यांच्या रोजच्या दैनंदिनीचा भाग बनला आहे.