काय सांगता ! होय, 70 रूपयांच्या कंडोमच्या नादात एकाने गमावले 3 लाख

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   70 रूपयांचा कंडोम खरेदी करण्याच्या नादात एका व्यक्तीने 3 लाखांपेक्षा पेक्षा अधिक रक्कम गमावल्याची घटना बिहारच्या भागलपूरमधील घंटाघरमध्ये घडली आहे. मेडिकल दुकानासमोर स्कुटी उभी करून कंडोम आणण्यासाठी गेले असता चोरट्याने स्कुटीच्या डिक्कीत बॅगमध्ये ठेवलेल्या 3 लाख रुपयांवर डल्ला मारला.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीचे पैसे चोरीला गेले आहेत, ती व्यक्ती आसाममध्ये एअरफोर्समध्ये आहे. पीडीत व्यक्तीने घंटाघर येथील पोस्ट ऑफिसमधून 3 लाख 10 हजार रुपये काढले होते. त्यानंतर ते स्कुटीच्या डिक्कीत ठेवून तो घराकडे निघाला होता. रस्त्यात थांबून त्याने काही वस्तू खरेदी केली. त्या डिक्कीत ठेवल्या. त्यावेळी डिक्कीत पैसे होते. त्यानंतर पुढे जाऊन तो महावीर मेडिकल दुकानामसोर थांबला. चावी स्कुटीला ठेवूनच तो मेडीकलमध्ये जावून 70 रुपयांचे कंडोम घेतले. त्यानंतर तो परत मेडिकलमधून स्कुटीजवळ आला तोपर्यंत कुणीतरी त्याच्या पैशावर डल्ला मारल्याचे दिसून आले. त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना फोन करून दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मेडिकल दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही चेक केले. पण त्यातून काही हाती लागले नाही. डिक्की उघडलेली दिसली. पण ती कुणी उघडली, त्यातून काय़ काढले हे दिसले नाही.