Bhagat Singh Koshyari | मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. ते पुण्यात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात बोलत बोते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) त्यांच्या या नवीन विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अगोदर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

 

यावेळी कोश्यारी यांचे या सोहळ्यात भाषण सुरू होते. त्यांच्या समोरील बाजूस व्हिडिओ काढणाऱ्या माणसाच्या मागे एक महिला बसली होती. त्यांना व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे त्या महिलेने राज्यपालांना तुम्ही दुसऱ्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर कोश्यारींनी तुम्हाला भाषण ऐकायचे आहे की, बघायचे आहे, असा प्रश्न केला. त्यावरून सभागृहात हशा पिकला. कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले, “मैं मानता ही नहीं हूं की, मैं राज्यपाल हूँ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला” त्यामुळे त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मागील काही दिवस चर्चेत आहेत.
त्यांनी औरंगाबाद विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते.
शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक झाले आहेत, असे राज्यपाल म्हणाले होते.
त्यावर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडी यात अग्रणी आहे.
महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी ‘राज्यपालांना हटवा’ या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

 

Web Title :- Bhagat Singh Koshyari | governer bhagat singh koshyari said i do not consider myself a governor in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम