Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त विधानावरून राज्यपालांचे शहा यांना स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावर राज्यात वादंग उठले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडीने येत्या 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाकदेखील दिली आहे. त्यामुळे राज्यपाल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महापुरुषांच्या अनादराची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) या पत्रात म्हटले आहे.

माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी त्याचे राजकीय भांडवल केले. मी म्हणालो होतो, की मी ज्यावेळी शाळेत शिकत होतो, तेव्हा महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत असत. पण, आता युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्शसुद्धा शोधत असते. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातील नितीन गडकरी आणि शरद पवार हेदेखील आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा यासुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श असू शकतो. माझे म्हणणे साफ आणि स्वच्छ होते. त्याचे लोकांनी राजकीय भांडवल करत रान उठवले आहे, असे राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पत्रात नमूद केले आहे.

Advt.

राज्यपालांनी मी महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांना भेटी दिल्याचेदेखील म्हटले आहे.
वर्तमानातील कोणा मोठ्या माणसाचा आदर्श असणे, म्हणजे मागे होऊन गेलेल्या महापुरुषांचा अपमान करणे
होत नाही, असे राज्यपाल म्हणाले आहेत. तसेच मुघल काळात साहस,
त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप असलेल्या महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंहजी,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना
करू शकत नाही, असे देखील राज्यपालांनी नमूद केले आहे.

Web Title :- Bhagat Singh Koshyari | Governor’s explanation to Shah on the controversial statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update