Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhagat Singh Koshyari | मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का पोहचवणारे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केल्याने सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. मुंबईतील (Mumbai) जे. पी. रोड, अंधेरी (प) येथे दाऊद बाग जंक्शन येथील चौकाच्या नामकरण आणि उद्घाटन सोहळ्यात शुक्रवारी राज्यपालांनी हे वक्तव्य केले. येथील चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. याप्रसंगी केलेल्या भाषणात महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केल्याचा आरोप कोश्यारी यांच्यावर होत आहे.
नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही. या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी इ. उपस्थित होते.
—
Member of Parliament Navneet Rana, MLAs Ravi Rana, Amit Satam, Nilesh Rane, Bharati Lavekar and Pankaj Bhoyar, Choreographer Remo D'Souza and Trustee Rakesh Kothari were prominent among those present. pic.twitter.com/w9AE9VWWX4
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 29, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेने देखील राज्यपालांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे. pic.twitter.com/jfM1pQ4p0w
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 29, 2022
तर सचिन सावंत यांनी म्हटले की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे.
गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे.
यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहे,
शिवाय महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.
Web Title : – Bhagat Singh Koshyari | maharashtra governor bhagat singh koshyari controversial comment on financial capital of india mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update