भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंग कोश्यारी यांची यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. माजी राज्यपाल विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन राज्यपाल कोण होणार याची उत्सुकता मागील अनेक दिवसांपासून होती आणि त्यासंदर्भात अनेक चर्चादेखील झडत होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

कोण आहेत भगतसिंग कोश्यारी :
भारतीय जनता पक्षाचे भारतीय नेते असणारे कोश्यारी उत्तराखंड राज्याचे दुसरे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. २००२ ते २००७ या काळात उत्तराखंड विधानसभेत ते विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. ते राज्यसभेचे सदस्य होते.

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे स्वयंसेवक राहिले आहेत. १९७७ मध्ये आणीबाणीच्या वेळी त्यांनी निषेध केला आणि तुरुंगवास भोगला. सन २००० मध्ये त्यांना नव्याने निर्माण झालेल्या उत्तर प्रदेशचे (आताचे उत्तराखंड) ऊर्जा, पाटबंधारे, कायदे आणि कायदेविषयक मंत्री म्हणून नियुक्त केले गेले. २००१ मध्ये ते नित्यानंद स्वामी यांच्या जागी मुख्यमंत्री झाले. उत्तराखंडमध्ये त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही पदभार स्वीकारला. २००२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

२००७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागले. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मेजर जनरल भुवनचंद्र खंडूरी यांना मुख्यमंत्री बनवले गेले.

आरोग्यविषयक वृत्त –