‘कंगना-शिवसेना’ वादात राज्यपालांची Entry ! दिल्लीपर्यंत जाणार प्रकरण ?

पोलिसनामा ऑनलाइन – मुंबई बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर बॉलिवूड स्टार कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. याची दखल आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. मंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईवर आता राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आलं आहे असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलवून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली असं राज्यपाल म्हणाले आहेत. राज्यपाल कोश्यारी आता यासंदर्भातील अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची सूत्रे स्विकारल्यापासून राज्यपाल आणि ठाकरे यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत.

दरम्यान मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू झाला आहे. यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात एकमेकांवर टीका होताना दिसली. यानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली होती. यांनतर आता हे प्रकरण आणखीच चिघळताना दिसत आहे.