Bhagatsingh Koshyari | … अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्क खाली ओढला (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (Kothrud Chhatrapati Shivaji Maharaj Statue) ते बालगंधर्व (Balgandharva) मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुण्यात सायकल रॅलीचे (Cycle rally in Pune) आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क (Mask) स्वत:च हाताने खाली ओढला.

राज्यापालांच्या (Governor) या कृतीमुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. तर दुसऱ्या बाजूला केंद्र (Central) आणि राज्य सरकारने (State Government) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना, थेट राज्यपालांनीच महिलेचा मास्क खाली केल्याने, एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, सायकल रॅली ही एक दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे.
अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळण्यास मदत होते.
सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस (Yoga Day) साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला, अशा शब्दांत त्यांनी मोदींचे कौतुक केले.

Web Titel :- Bhagatsingh Koshyari | pm modi birthday governor bhagatsingh koshyari pune cycle rally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whatsapp Multi Device Support Feature | व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘त्या’ फीचरची प्रतिक्षा संपली, जाणून घ्या

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी मंत्री रावसाहेब दानवेंना मारला टोमणा, म्हणाले – ‘कदाचित त्यांना शिवसेनेत यायचं असेल’

Money laundering Case | सचिन वाझेचा खुलासा – ‘शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले होते’