Bhagini Nivedita Bank | भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा 22 मार्च रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष प्रारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhagini Nivedita Bank | महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षप्रारंभ सोहळा बुधवार २२ मार्च २०२३ रोजी पुण्यात संपन्न होत आहे. हा कार्यक्रम २२ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता माजी केंद्रीय मंत्री आणि ऋषीहुड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आणि लेखिका मृदुला भाटकर (Mridula Bhatkar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. (Bhagini Nivedita Bank)
याबरोबरच गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे कुलगुरू, लेखक आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.अजित रानडे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. याप्रसंगी बँकेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेचे मुख्य सभागृह, लायब्ररी बिल्डींगच्या वर शिवाजीनगर, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर (CA Dr Revati Paithankar) , उपाध्यक्षा दीपा दाढे (Deepa Dadhe) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे (CEO Smita Deshpande) यांनी दिली. (Bhagini Nivedita Bank)
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या बनलेल्या आयरिश वंशाच्या मार्गारेट नोबल या युवतीने
भारतात मानवसेवेचे त्यातही महिलांच्या उन्नतीसाठी मोठे काम केले. त्यांचे नामकरण
भगिनी निवेदिता असे ठेवले गेले होते. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ २४ मार्च १९७४
रोजी प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट विवेक दाढे व त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी दाढे यांनी या बँकेची
मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यंदापासून सुरु होत आहे. संपूर्ण महिलांनी चालवलेली ही बँक हे या बँकेचे वैशिष्ट्य आहे.
Web Title :- Bhagini Nivedita Bank | Bhagini Nivedita Sahakari Bank started its golden jubilee year on 22nd March
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sachin Tendulkar | वनडे क्रिकेट टी-20 पेक्षा थरारक आणि रंजक होण्यासाठी सचिनने दिला ‘हा’ सल्ला