विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.

भगवा चौक गणेश मत्र मंडळाने सामाजीक भान राखत यंदा विसर्जन मिरवणुकीत होणारा अवाजवी खर्च टाळत साधेपणाने गणेश मुर्ती विसर्जन करण्याचा निर्णय मंडळाचे कार्यकर्त व पदाधिकारी यांनी घेतला. विसर्जन मिरवणुकीतील सगळा खर्च रद्द करून पैसे बचत केले आणि त्यातुन धूळे पांझरा नदी पुरा मध्ये ज्या धुळेकर बांधवांचे घरातील सर्व साहित्य पाण्यात वाहून गेले त्यांना संसार उपयोगी साहित्य आज बुधवारी चार कुटुंबांना देण्यात आले.

पूरग्रस्त कुटुंबियांची नावे –

१) महादू रामदास माळी
२) कामाअप्पा शेख बाई
३) सतीष गोटू कापडे
४) ठगुबाई माळी(आजीबाई)

सगळ्यांना मदतीचा हात देत मंडळाच्या वतीने सामाजीक बांधीलकी जपण्यात आली.
अशा उपक्रमातून अन्य मंडळे प्रेरणा घेतील व मदतीचा हात पुरग्रस्त कुटूंबियांना मिळेल अशी आशा अँड.पंकज गोरे यांनी व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त –