‘मंदिर वही बनाएंगे’ म्हणताच भागवतांच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी

प्रयागराज : वृत्तसंस्था – प्रयागराज येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज अयोध्येतील राम जन्मभूमीवरच राम मंदिर बांधण्याचे वक्तव्य पुन्हा एकदा केल्याचे दिसून आाले. मोहन भागवत यांनी आज राम मंदिर बांधण्याचा पुनरुच्चार केल्यानंतर उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला. सदर प्रकरण आयोजक आणि उपस्थितांमध्ये हाणामारी होण्यापर्यंत गेले.

प्रयागराज येथील एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, ”रामजन्मभूमीवरच भव्य राम मंदिराची निर्मिती होईल. आता ते कसे बांधायचे हे सरकारने ठरवले पाहिजे. जर सरकारने राम मंदिराबाबत सकारात्मक पावले उचलली तर भगवान रामाचा आशीर्वाद मिळेल. राम मंदिराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे याची आम्हाला जाणीव आहे. तसेच राम मंदिराची निर्मिती लवकरात लवकर सुरुवात होईल,अशी अपेक्षा आहे.”

त्यांच्या या वक्तव्यानंतर राम मंदिरावरून आक्रमक पवित्रा घेतला. शिवाय भागवत यांना या मुद्द्यावरून टोला लगावला. ते म्हणाले की, ”केवळ एकदा कार सेवा करून राम मंदिराची बांधणी पूर्ण होणार नाही. दम असेल तर कारसेवा करा आणि नसेल तर सन्मानाने माघारी फिरा. संघ मंदिर बांधणीसाठी शक्ती पणाला लावेल. अयोध्येत केवळ भव्य राम मंदिरच बनेल.”

यानंतर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ”राजकीय वर्तुळात काही घडो, राम मंदिर बांधले जावे अशी जनतेची इच्छा आहे. तीन चार महिन्यांत निर्णय झाला तर होईल. अन्यथा चार महिन्यांनंतर बांधकामाला सुरुवात होईल. सरकारने कोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.” भागवत यांनी हे वाक्य उच्चारताच उपस्थितांनी मंदिर बांधणीची तारीख सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर आयोजकांनी घोषणा देणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण अगदी हाताबाहेर गेल्याचे दिसून आले. सदर प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले.