‘जुगारअड्डा’ चालविण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला मुंबई पोलिसांनी आज (बुधवार दि ३ जुलै) अटक केली आहे. हिमालयवर आरोप आहे की मुंबईतील लोखंडवाला भागात गँबलिंग रॅकेट चालवत होता. मुंबईतील अंबोली पोलिसांनी हिमालयला अटक केली आहे. पोलिसांनी आणखी काही लोकांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून ते पुढील चौकशी करत आहेत.

Bhagyashree

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी अंधेरीत छापेमारी केली होती. या छापेमारीत १५ लोकांना अटक करण्यात आली होती. या तपासात हिमालय दासानीचं नाव समोर आलं होतं. मुंबईतील अंधेरी पश्चिममधील इंफिनिटी मॉलमध्ये गेल्या महिन्यात पोलिसांनी छापेमारी केली होती. याबाबतीत हिमालयने किंवा त्याच्या कुटुंबियांने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

कोण आहे हिमालय दासानी ?

हिमालय दासानी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीचा पती आहे. हिमालय हा देखील बॉलिवूड अॅक्टर आहे. हिमालयने त्याची पत्नी भाग्यश्रीसोबत अनेक सिनेमात काम केलं आहे. २०१८ मध्ये आलेल्या अभिमन्यच्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमात हिमालयने अभिमन्यूची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याचे कामाचे खूप कौतुक झाले होते.

पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

वंचितने कॉंग्रेसला दिला ‘एवढ्या’ जागांचा फॉर्म्यूला, मंजूर असल्यास कॉंगेसने १० दिवसांच्या आत संपर्क साधावा – वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम