Bhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांची 5 शहरात मोठी कारवाई; विविध शहरातून 12 जण ताब्यात

पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून एकाच वेळी जळगाव, धुळे, औरंगाबाद, पुणे अन् मंंबईत कारवाई, बीएचआर घोटाळा प्रकणात उद्योजक, राजकारण्यांसह12 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव (Jalgaon) येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) Bhaichand Hirachand Raisoni फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस (Pune Police) दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offence Wing, Pune) गुरुवारी जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात एकाच वेळी 15 पथकांच्या मार्फत कारवाई केली असून आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. Economic Offence Wing of Pune Police Detained 12 in Bhaichand Hirachand Raisoni Case

सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन ( रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे ( रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या 12 जणांना गुरुवारी एकाच वेळी ताब्यात घेतले आहे.. यासाठी 15 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

पुणे पोलिसांनी (Pune Police) आज सकाळी 6 वाजता अचानक एकाचवेळी पाच ठिकाणी छापे घातले असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे यांना तर ते सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजिकच्या पोलीस ठाण्यात नेले.
त्याचवेळी जामनेर येथे पंचायत समितीच्या माजी सभापती यांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव, भुसावळ, अमळनेर, पाळधी येथून अनेकांना ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offence Wing, Pune) पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यात बसविले आहे.
त्यांच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली.
असून ही कारवाई दिवसभर चालण्याची शक्यता आहे.

बीएचआर (BHR) पतसंस्थेचे आवसायक जितेंद्र कंडारे यानेच आवसानीत काढण्यात आलेल्या पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार करुन भष्ट्राचार केला.
त्यात त्याने अनेकांना त्यांचे ठेवीच्या 30 ते 40 टक्के पैसे देऊन त्यांना 100 टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेतले.
आज पकडण्यात आलेल्यांनी बीआरएच पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या 30 ते 40 टक्के पैसे देऊन त्यांना 100 टक्के पैसे परत केल्याचे दाखविले व त्यातून आपले कर्ज परतफेड केल्याचे दाखविले होते.

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके deputy commissioner of police bhagyashree navtake यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात २ पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ निरीक्षक, १०० कर्मचारी असा फौजफाट्यासह जळगाव मध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी कारवाई केली होती.
त्यातून बीएचआर पतसंस्थेमधील घोटाळ्यातील अनेक जणांना पकडण्यात आले होते.
तसेच मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती.
त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offence Wing, Pune) पथकाने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात अनेक वेळा कारवाई केली आहे.
नोव्हेंबर प्रमाणेच आज पुन्हा एकदा मोठी कारवाई पुणे पोलिसांनी (Pune Police) केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Wab Title :- Bhaichand Hirachand Raisoni | Economic Offence Wing of Pune Police Detained 12 in Bhaichand Hirachand Raisoni Case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात