bhaichand hirachand raisoni माझी चौकशी राजकीय हेतूने नव्हती, तर बीएचआरची राजकीय कशी?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बीएचआर (BHR) अर्थात भाईचंद हिरांचद रायसोनी bhaichand hirachand raisoni सहकारी बँकेतील गैरव्यवहराच्या कारवाईचे समर्थन केलं आहे. माझी याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, इन्कम टॅक्स विभाग, लोकायुक्त, एटीएसकडून चौकशी झालीय. सध्या ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. माझ्या एवढ्या चौकशा होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर (BHR) प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो ? असा सवाल एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळी ते आज पत्रकारांशी बोलत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी..
एकनाथ खडसे (Eknath Khadse) बीएचआर (BHR) प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीचे स्वागत करत म्हणाले, बीएचआर (BHR) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, असं मत खडसे यांनी व्यक्त केले आहे.

जे दोषी असतील त्यांना शासन होईलच..
बीएचआर (bhaichand hirachand raisoni) पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला.
त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले.
आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.
त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही.
तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे.
या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो अथवा मोठा असो.
पुढे खडसे म्हणाले, आता सध्या ईडीकडून देखील चौकशी सुरू आहे.
मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकशा होऊ शकतात.
तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर (BHR) प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? अशा टोला देखील खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांनाही लगावला आहे.

ॲड. कीर्ती पाटलांच्या तक्रारीनुसार चौकशी..
भाईचंद हिरांचद रायसोनी सहकारी (bhaichand hirachand raisoni) पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. त्यामुळे जळगावच्या ॲड. कीर्ती पाटील (Adv. Kirti Patil) यांनी 2018 रोजी या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी यांच्या मागणीवरून केंद्रीय सहकारमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने करावी, अशा सूचना केल्या होत्या.
शेकडो नागरिकांनी ठेवीदारांच्या ठेवी नाममात्र दरात घेऊन आपली कर्जे मॅचिंगद्वारे फेडल्याचे दर्शवले आहे.
पुढे खडसे (Eknath Khadse) म्हणाले, खोट्या कागदपत्रांचा वापर करून पात्रता नसताना देखील अनेकांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले. म्हणून पतसंस्था डबघाईला गेली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel : bhaichand hirachand raisoni my inquiry was not politically motivated then how bhr inquiry is political asks eknath khadse

 

हे देखील वाचा

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, 253 रुग्णांना डिस्चार्ज

pune municipal corporation | पहिल्या तिमाहीत महापालिकेचे उत्पन्न घटले; महागाई व वेतनामुळे खर्च वाढला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा