‘भाईजान’ सलमानच्या ‘तेरे बिना’ या नवीन गाण्याचा टीजर ‘रिलीज’ ! खास अंदाजात दिसते ‘जॅकलीन’ (व्हिडीओ)


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार सलमान खानचं प्यार करोना हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. या गाण्याला खूप पसंती मिळाली होती. यानंतर आता त्याचं दुसरं गाणं येणार आहे. या गण्याचं नाव आहे तेरे बिना. या गाण्यालाही सलमान खाननंच आवाज दिला आहे. नुकताच या गाण्यााचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. खास बात अशी या गाण्यात सलमान खान सोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील दिसणार आहे. 12 मे 2020 रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खाननं जॅकलीन फर्नांडिससोबत अलीकडेच एक मुलाखत दिली. यात बोलताना तो म्हणाला की, “एक गाणं माझ्या डोक्यात होतं म्हटलं चला या काळात रिलीज करूया. आमच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये माझा लहानपणीचा मित्र राहतो त्याचं नाव आहे अज्जु भाटिया. त्यानं हे गाणं ऐकवलं तर मला खूप आवडलं. तो म्हणाला की, हे असं गाणं आहे जे कोणत्याही सिनेमात फिट होत नाही. मी विचार केला की, इथंच हे गाणं रिलीज करू. आपलं प्रॉडक्शन हाऊस तर आहेच.”

सलमान खानच्या गाण्याचा टीजर तर रिलीज झाला आहे. परंतु आता गाणं रिलीज झाल्यानंतर ते चाहत्यांना किती आवडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जॅकलीन फर्नांडिस, वलूशा डिसूजा, आयुष शर्मा, सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर ही सगळी मंडळी पनवेलवरील त्याच्या फार्म हाऊसवर थांबलेली आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु आता लॉकडाऊनमुळं हे शक्य होईल असं काही वाटत नाही.