भैरवनाथ चारीटेबल ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी, संस्थेचे काम प्रेरणादायी : तहसीलदार शरद पाटील

कुडाळ : जावळी तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा वाढू लागला असून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर रात्रीचा दिवस करून काम करत आहे. कोरोना बधितांवर वेळेत उपचार व्हावे त्यांना बेड मिळावे यासाठी जावळी कोविड इमर्जन्सी ग्रुप व भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक बांधिलकीतुन काम करत असून संस्थेचे हे उपक्रम प्रेरणादायी असून जावळी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावळी कोविड इमर्जन्सी ग्रुप च्या प्रमुख जयश्री शेलार यांच्या आवाहनानुसार भैरवनाथ चॅरिटेबल व कोविड इमर्जन्सी ग्रुप यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन मशीन तसेच इतर आवश्यक साधनांच्या वाटप प्रसंगीं ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी भगवानराव मोहिते, वैद्यकीय अधिकारी साधना कवारे, मंडलाधिकारी ए. ए. मेमन,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे,उद्योजक राजेंद्र धनावडे, विजय सावले,समाज सेवक संजय शिर्के, विनोद शिंगटे, अशोक पार्टे, जयश्री शेलार,दत्तात्रय बेलोशे, कोल्हापूर च्या शिवसेना संपर्कप्रमुख दिव्या बडवे, , सरपंच रवींद्र सल्लक, अंकुश बेलोशे, संकेत पाटील,आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, धनश्री शेलार, साक्षी उंबरकर,आशा कासुर्डे, सुरेश कासुर्डे,रमेश वाडकर,दीपक मोरे, संतोष पार्टे, प्रवीण पार्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पुढीलप्रमाणे उपकरणे देण्यात आली आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या कडून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटेड मशीन,मुंबई येथील उद्योजक आनंद दरगर यांच्या वतीने जावळी बँकेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रय बेलोशे यांच्या प्रयत्नांतून केडंबे व म्हाते उपकेंद्राला प्रत्येकी एक ऑक्सिजन मशीन, विजय सावले यांच्या वतीने अंगणवाडी सेविकांना पल्स ऑक्सि मीटर, थर्मामीटर,मास्क तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० पीपीई किट, मास्क, कॅल्शियम व व्हिटॅमिन गोळ्या देण्यात आल्या. तर विजयराव मोकाशी यांचेकडून २ डिजिटल बीपी मीटर ,अशोक शेलार यांचेकडून कॅल्शियम व व्हिटॅमिन गोळ्या तसेच १९८५ च्या भैरवनाथ विद्यालयातील दहावी बॅच च्या वतीने २५ हजार रुपये,पुनवडी ग्रामस्थ २५ हजार रुपये कोविड हॉस्पिटलमसाठी देण्यात आले. कार्यक्रमास भैरवनाथ ट्रस्ट चे पदाधिकारी ,ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. विशाल रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मर्ढेकर यांनी आभार मानले.

केळघर:प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य वाटप प्रसंगी शरद पाटील. त्यावेळी सतीश बुद्धे, भगवान मोहिते, ज्ञानदेव रांजणे,राजेंद्र धनावडे, विजय सावले, विनोद शिंगटे,अशोक पार्टे आदी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like