भैरवनाथ तळ्याच्याभोवती बांधलेली सीमाभिंत पाडली; वाघोली ग्रामपंचायतीची तक्रार

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन  –   वाघोली-भावडी (ता:हवेली) रस्त्यालगत असणाऱ्या भैरवनाथ तळ्याभोवती बांधलेली सीमा भिंत अज्ञात नागरिकाने मध्यरात्री पाडली. मैशीना तळ्यात नेण्यासाठी ही भिंत पाडल्याचे समोर येत आहे. या विरोधात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व लोणीकंद पोलीस यांच्याकडे तक्रार दिली आहे.

सध्या भैरवनाथ तळ्याचा परिसर सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. हा परिसर वाघोलीकराणसाठी विरंगुळ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. पीएमआरडीए व ग्रामपंचायत निधीतून हे सुशोभीकरण सुरू आहे. ग्रामनिधीतून सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी माजी उपसरपंच व सदस्य रामकृष्ण सातव पाटील सातत्याने पाठपुरवठा करून या कामावर लक्ष ठेवीत आहेत.या तळ्यातील गाळ काढल्याने तळ्यात १२ महिने पाणी असते. या पाण्याचा उपयोग परिसरातील बोरवेल आणि विहिरीना होत आहे. तळ्याची खोलीकरण वाढविल्याने पाणी पातळी वाढली आहे.या तळयामुळे पूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या खारी विहरीलाही पाणी साठा वाढला असून टंचाईच्या काळात तो पाणी साठा उपयोगी येत असतो. याच तळ्याचा सीमा भिंतीचा काही भाग अज्ञात इसमाने पाडल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने तक्रार अर्ज दिला. तर या कामाबाबत एका नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.या तक्रारदाराने केलेले आरोप खोटे आहेत. उलट त्यानेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गोठा बांधला आहे. तरी तळ्यातील पाणी वापरास त्याला मुभा दिली आहे. त्यानेच ही सीमाभिंत पडून शासकीय कामाचे नुकसान केले आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याने त्याला जीवे मारण्याची दिलेली धमकी खोटी असून ग्रामविकास अधिकारी यांनी त्याला पाहिले सुद्धा नाही.असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.